Under 19 women T20 World cup final: भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी रविवारचा (दि. २९ जानेवारी) दिवस खूपच महत्त्वाचा ठरला. या दिवशी १९ वर्षांखालील महिला टी२० विश्वचषक २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला त्यात टीम इंडियाने इंग्लंडला अक्षरशः लोळवत ७ गडी राखून धूळ चारली आणि पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले. सेनवेस पार्क येथे पार पडलेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडला धोबीपछाड देत अंडर-१९ विश्वचषकाची पहिली आवृत्ती आपल्या नावावर केली.

कर्णधार शफाली वर्मा हिच्या नेतृत्वातील भारतीय संघ पहिल्या-वहिल्या १९ वर्षांखालील महिला टी२० विश्वचषकाचा किताब पटकाण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होता. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो गोलंदाजांनी सार्थ ठरवत इंग्लंडला ६८ धावांवर सर्वबाद केले. तीतस साधूला सामनाविराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर इंग्लंडची कर्णधार ग्रेस स्क्रिव्हन्सला मालिकावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

इंग्लंडने ठेवलेल्या केवळ ६९ धावांचा पाठलाग करताना भारताची चांगली सुरुवात झाली मात्र १६ धावांवर कर्णधार शफाली वर्माला १५ (११) हन्ना बेकरने अलेक्सा स्टोनहाउसकरवी झेलबाद केले. त्यापाठोपाठ सलामीवीर श्वेता देखील केवळ ५(६) धावा करून बाद झाली. त्यानंतर आलेल्या सौम्या तिवारी आणि त्रिशा गोंगडी यांच्यात ४६ धावांची भागीदारी झाली. मात्र २४(२९) करून त्रिशा बाद झाली. सौम्याने ३७ चेंडूत २४ धावा करून पहिल्या-वहिल्या अंडर-१९ विश्वचषकात पहिला-वहिला विजय मिळवून दिला.

हेही वाचा: Australian Open 2023: नोव्हाक जोकोविच १०व्यांदा बनला ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन, विजेतेपदाबरोबर केले नवीन विक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर अवघे ६९ धावांचे  माफक लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडच्या फलंदाजीची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात अवघ्या एका धावेवर त्यांनी लिबर्टी हीपच्या स्वरुपात पहिली विकेट गमावली. त्यानंतर कर्णधार ग्रेस स्क्रिव्हन्स हिला देखील भारतीय गोलंदाजीचा सामना करणे अवघड झाले तिने केवळ ४ धावा केल्या. पहिल्या १० षटकात केवळ ३९ धावांत इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला होता. नियाम फिओना हॉलंड १० (८), रायना मॅकडोनाल्ड गे १९ (२४), अलेक्सा स्टोनहाउस ११(२५) आणि सोफिया स्मेल ११(७) वगळता कोणालाही दोनआकडी धावसंख्या गाठता आली नाही. भारतीय महिला गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. तीतस साधू, अर्चना देवी आणि पार्शवी चोप्रा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तर मन्नत कश्यप, सोनम यादव आणि कर्णधार अष्टपैलू शफाली वर्मा यांना प्रत्येकी १ गडी बाद करण्यात यश आले.