आयपीएलच्या बाराव्या हंगामाच्या अंतिम सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांनी पहिल्यांदा गोलंदाजी करताना, मुंबईला १४९ धावांमध्ये रोखण्यात यश मिळवलं. रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक यांनी फटकेबाजी करत मुंबईला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर मुंबईच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. मधल्या फळीत हार्दिक पांड्याने पोलार्डच्या साथीने संघाचा डाव सावरला. यावेळी शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्याने सणसणीत षटकार खेचत सर्वांचं मन जिंकलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुर्दैवाने हार्दिक पांड्या मोठी खेळी साकारू शकला नाही. मात्र ठाकूरच्या गोलंदाजीवर खेचलेला हेलिकॉप्टर शॉट पाहून धोनीही चांगलाच अवाक झाला. पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईने पोलार्डच्या फटकेबाजीच्या जोरावर १४९ धावांपर्यंत मजल मारली.