IPL 2019 स्पर्धेला २३ मार्चपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतील साखळी सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. या फेरीतील शेवटचा सामना ५ मे रोजी होणार आहे. या हंगामात चाहत्यांचे सर्वाधिक लक्ष आहे ते मुंबई इंडियन्सकडून आपला पहिलाच हंगाम खेळणारा युवराज सिंग याच्या कामगिरीकडे… या हंगामाचा मुंबईचा पहिला सामना २४ मार्चला वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स यांच्याशी होणार आहे. या हंगामात मुंबई इंडियन्सकडून युवराज प्रथमच खेळणार आहे त्यामुळे युवीही अतिशय उत्सुक आहे.
आपल्या संघाकडून चांगली कामगीरी करण्यासाठी युवराजने कसून तयारीही सुरु केली आहे. याबाबतचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघाने ट्विट केला होता.
Video : …आणि युवीला आठवला २०११ च्या विश्वचषकाचा अंतिम सामना
त्यानंतर आता मुंबई इंडियन्सच्या मालक असलेल्या नीता अंबानी यांनी आपल्या संघात नव्याने दाखल झालेल्या खेळाडूंचे खास स्वागत केले.
Say hello to the new members of the MI family #CricketMeriJaan #OneFamily @YUVSTRONG12 @ImZaheer @iamanmolpreet28 @sranbarinder pic.twitter.com/AN8srCbO4O
— Mumbai Indians (@mipaltan) March 18, 2019
यात युवराजच्या स्वागताला विशेष महत्व होते. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाने त्याच्या स्वागताचा एक खास फोटो ट्विट केला आहे.
We all are #OneFamily #CricketMeriJaan @YUVSTRONG12 pic.twitter.com/5qpGZebXbw
— Mumbai Indians (@mipaltan) March 18, 2019
IPL च्या लिलावात मुंबई इंडियन्सने सहा खेळाडूंना आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. यात लसिथ मलिंगाचे पुनरागमन झाले. गेल्या वर्षी अकराव्या हंगामासाठी झालेल्या लिलावात मुंबईने मलिंगावर बोली लावली नव्हती, मात्र संघ व्यवस्थापनाने लसिथ मलिंगाला गोलंदाजी मार्गदर्शक म्हणून संघात समाविष्ट करुन घेतले होते. त्याचा इतर तरुण गोलंदाजांना फायदा झाला. या वेळी मलिंगाला मुंबईने २ कोटीच्या मूळ किमतीला विकत घेतले आहे. त्याशिवाय बांगलादेशचा मुस्ताफिजूर रहमानचाही ताफ्यात समावेश करण्यात आला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५ आणि २०१७ अशी ३ विजेतेपद पटकावली आहेत.
रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स संघ विरुद्ध शिखर धवनचा दिल्ली कपिटल्स संघ या स्पर्धेच्या पहिल्याच आठवड्यात आमनेसामने येणार आहेत. २४ मार्चला हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर रंगणार आहे. पण या स्पर्धेमध्ये सुरुवातीला पंजाबच्या संघात असलेला युवराज मुंबईच्या संघातून यंदाचे IPL खेळणार असल्याने या सामन्यालाही तितकेच महत्व असणार आहे.
मुंबईचे वानखेडे मैदानावरील सामने –
२४ मार्च : मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई
३ एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई
१० एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, मुंबई
१३ एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई
१५ एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई
२ मे : मुंबई इंडियन्स वि. सनराइझर्स हैदराबाद, मुंबई
५ मे : मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, मुंबई