IPL 2019 ही बहुप्रतीक्षित स्पर्धा २३ मार्च पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या २ आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र IPL चं उर्वरित वेळापत्रक हे लोकसभेच्या निवणुकांचा नियोजित कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर घोषित करण्यात येणार होते. त्यानुसार आज BCCI आज साखळी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
यंदाच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकांमुळे IPL 2019 देशाबाहेर खेळवण्यावर विचार सुरु होता. मात्र, अखेरीस ही स्पर्धा देशातच खेळवण्यावर एकमत झालं. अकराव्या हंगामाचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज संघ या हंगामाची सुरुवात करणार असून त्यांचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाशी होणार आहे. याचसोबत मुंबई इंडियन्सचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. मात्र उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक, प्ले ऑफ्सचे सामने आणि अंतिम सामना याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता आहे. त्यानुसार स्पर्धेतील साखळी सामन्यांचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे.
Full MI Schedule – @IPL 2019
What MI match are you looking forward to the most?#CricketMeriJaan #OneFamily #IPL2019 @ImRo45 @Jaspritbumrah93 @YUVSTRONG12 pic.twitter.com/rQeVPUBTwm
— Mumbai Indians (@mipaltan) March 19, 2019
लोकसभा निवडणुकींच्या तारखा जाहीर झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL) संपूर्ण वेळापत्रकाची उत्सुकता होती. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मंगळवारी IPL च्या साखळी फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आणि त्यानुसार प्रत्येक संघ घरच्या मैदानावर किमान सात सामने खेळणार आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी BCCI ने IPL च्या पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर केले होते. भारतात लोकसभा निवडणुका ११ एप्रिल ते १९ मे या कालावधीत सात टप्प्यात होणार आहे. त्यामुळे IPL चे सामने वेगळ्या शहरांमध्ये खेळवण्याची शक्यता निर्माण झाली होती. विशेषतः मुंबई आणि कोलकाता या प्रमुख शहरांतील सामने हलवण्यात येतील, अशी चर्चा होती. पण, BCCI ने हे सामने प्रमुख तेथेच खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.
२४ मार्च : मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई
३ एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई
१० एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, मुंबई
१३ एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई
१५ एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई
२ मे : मुंबई इंडियन्स वि. सनराइझर्स हैदराबाद, मुंबई
५ मे : मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, मुंबई