IPL 2019 SRH vs RCB Updates : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायजर्स हैदराबाद विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्यात हैदराबादने बंगळुरूवर ११८ धावांनी मात केली. बेअरस्टो आणि वॉर्नरच्या दमदार शतकांमुळे हैदराबादने बंगळुरूला २३२ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ केवळ ११३ धावांत गारद झाला. मोहम्मद नबीने हैदराबादकडून ११ धावांत ४ बळी टिपले.
हैदराबादने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पार्थिव पटेल स्वस्तात माघारी परतला आणि बंगळुरूला पहिला धक्का बसला. त्याने ८ चेंडूत २ चौकारांसह ११ धावा केल्या. उत्तुंग षटकार खेचत फटकेबाजीला सुरुवात केलेल्या हेटमायरला फारशी छाप पाडता आली नाही. तो पुढे येऊन फटका लगावणार तोच त्याला यष्टिचित करण्यात आले. त्याने केवळ ९ धावा केल्या. कर्णधार विराटला सर्वाधिक अपेक्षा असलेला डीव्हिलियर्स (१) त्रिफळाचीत झाला आणि बंगळुरूचा तिसरा गडी माघारी परतला. कर्णधार विराट कोहली धावा काढण्याच्या उद्देशाने फटका खेळला मात्र वॉर्नरने उत्तम झेल टिपला. विराटने १० चेंडूत केवळ ३ धावा केल्या. डावखुरा अष्टपैलू खेळाडू मोईन अली धावबाद झाला. चोरटी धाव घेताना त्याला संदीप शर्मा आणि नबी यांनी संयुक्त प्रयत्नाने धावबाद केले. त्यामुळे बंगळुरू मोठ्या पराभवाच्या छायेत असून त्यांची अवस्था ५ बाद ३० अशी झाली. देशांतर्गत स्पर्धांमध्ये एका षटकात ५ षटकार लगावण्याची किमया २ वेळा केलेल्या शिवम दुबेला या सामन्यात मात्र फारसे काही जमले नाही. केवळ १ चौकार मारल्यानंतर तो ५ धावांवर झेलबाद झाला आणि बंगळुरूला सहावा धक्का बसला. १६ वर्षीय बर्मनने २४ चेंडूत १९ धावा केल्या आणि तो बाद झाला. त्याने २ चौकार लगावले. त्यानंतर उमेश यादव आणि लगेचच डी ग्रँडहोम धावबाद झाले. उमेशने १४ धावा केल्या. डी ग्रँडहोमने मात्र काही काळ झुंज देत ३७ धावा केल्या. यात ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. अखेर चहलला बाद करत हैदराबादने विजयावर शिक्कामोर्तब केले.
केन विल्यमसनच्या जागी संघात स्थान मिळालेल्या मोहम्मद नबीने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात ११ धावा देत ४ बळी टिपले. यात पार्थिव पटेल, शिमरॉन हेटमायर, डिव्हिलियर्स आणि शिवम दुबे या चौघांना त्याने तंबूत धाडले. तसेच मोईन अलीला धावबाद करण्यात त्याचा मोलाचा वाटा होता.
त्याआधी, बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय पार फसला. सलामीवीर जॉनी बेअरस्टो (११४) आणि डेव्हिड वॉर्नर (नाबाद १००) या दोघांच्या शतकी झंजावातापुढे बंगळुरूच्या गोलंदाजांचे कोणतेही अस्त्र चालले नाही. बेअरस्टोने ५६ चेंडूत ११४ धावा केल्या. या खेळीत त्याने १२ चौकार आणि ७ षटकार लगावले. तर वॉर्नरने ५५ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकार लगावत नाबाद १०० धावा केल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १८५ धावांची भक्कम सलामी दिली. बेअरस्टो बाद झाल्यावर फलंदाजीसाठी आलेल्या विजय शंकरनेही १ षटकार खेचत ३ चेंडूत ९ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर बरोबर युसूफ पठाण ६ चेंडूत ६ धावा करून नाबाद राहिला. त्यामुळे हैदराबादने २० षटकात २ बाद २३१ धावा केल्या.

उमेश यादव आणि लगेचच डी ग्रँडहोम धावबाद झाले. उमेशने १४ धावा केल्या. डी ग्रँडहोमने मात्र खजी काळ झुंज देत ३७ धावा केल्या. यात ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
१६ वर्षीय बर्मनने २४ चेंडूत १९ धावा केल्या आणि तो बाद झाला. त्याने २ चौकार लगावले.
केन विल्यमसनच्या जागी संघात स्थान मिळालेल्या मोहम्मद नबीने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात ११ धावा देत ४ बळी टिपले. यात पार्थिव पटेल, शिमरॉन हेटमायर, डिव्हिलियर्स आणि शिवम दुबे या चौघांना त्याने तंबूत धाडले. तसेच मोईन अलीला धावबाद करण्यात त्याचा मोलाचा वाटा होता.
देशांतर्गत स्पर्धांमध्ये एका षटकात ५ षटकार लगावण्याची किमया २ वेळा केलेल्या शिवम दुबेला या सामन्यात मात्र फारसे काही जमले नाही. केवळ १ चौकार मारल्यानंतर तो ५ धावांवर झेलबाद झाला आणि बंगळुरूला सहावा धक्का बसला.
डावखुरा अष्टपैलू खेळाडू मोईन अली धावबाद झाला. चोरटी धाव घेताना त्याला संदीप शर्मा आणि नबी यांनी संयुक्त प्रयत्नाने धावबाद केले. त्यामुळे बंगळुरू मोठ्या पराभवाच्या छायेत असून त्यांची अवस्था ५ बाद ३० अशी झाली आहे.
कर्णधार विराट कोहली धावा काढण्याच्या उद्देशाने फटका खेळला मात्र वॉर्नरने उत्तम झेल टिपला. विराटने १० चेंडूत केवळ ३ धावा केल्या.
मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार विराटला सर्वाधिक अपेक्षा असलेला डीव्हिलियर्स त्रिफळाचीत झाला आणि बंगळुरूचा तिसरा गडी माघारी परतला. मुख्य म्हणजे तीनही बळी मोहम्मद नबीने टिपले.
उत्तुंग षटकार खेचत फटकेबाजीला सुरुवात केलेल्या हेटमायरला फारशी छाप पाडता आली नाही. तो पुढे येऊन फटका लगावणार तोच त्याला यष्टिचित करण्यात आले. त्याने केवळ ९ धावा केल्या.
मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पार्थिव पटेल स्वस्तात माघारी परतला आणि बंगळुरूला पहिला धक्का बसला. त्याने ८ चेंडूत २ चौकारांसह ११ धावा केल्या.
बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय पार फसला. बेअरस्टो आणि वॉर्नरच्या दमदार शतकांमुळे हैदराबादने बंगळुरूला २३२ धावांचे आव्हान दिले. बेअरस्टोने ५६ चेंडूत ११४ धावा केल्या. तर वॉर्नरने ५५ चेंडूत नाबाद १०० धावा केल्या.
बेअरस्टो बाद झाल्यावर वॉर्नरने फटकेबाजी सुरू ठेवत ५४ चेंडूत धमाकेदार शतक ठोकले. त्याने पूर्ण २० षटके फलंदाजी केली आणि ५५ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकार लगावत नाबाद १०० धावा केल्या.
बेअरस्टो बाद झाल्यावर फलंदाजीसाठी आलेल्या विजय शंकरनेही १ षटकार खेचत ३ चेंडूत ९ धावा केल्या. शेवटच्या काही षटकात एकेरी-दुहेरी धावा घेण्याच्या प्रयत्नात विजय शंकर धावबाद झाला आणि हैदराबादला दुसरा धक्का बसला.
दणकेबाज शतक ठोकणारा जॉनी बेअरस्टो मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला आणि १८४ धावांची सलामी भागीदारी तोडत बंगळुरूला अखेर पहिले यश मिळाले. बेअरस्टोने ५६ चेंडूत ११४ धावा केल्या. या खेळीत त्याने १२ चौकार आणि ७ षटकार लगावले.
बेअरस्टोचा बंगळुरूला दणका; ५२ चेंडूत ठोकले शतक
एकीकडे बेअरस्टो फटकेबाजी करत असताना डेव्हिड वॉर्नरने त्याला चांगली साथ दिली आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. याबरोबरच हैदराबादने दीडशतकी सलामी ठोकली.
हैदराबादकडून जॉनी बेअरस्टोने २८ चेंडूत दमदार अर्धशतक झळकावले. या खेळीत त्याने ९ चौकार आणि २ षटकार लगावले. याशिवाय वॉर्नर-बेअरस्टो जोडीने शतकी भागीदारी केली. सलग ३ वेळा शतकी सलामी देणारी ही IPL मधील पहिलीच जोडी ठरली आहे.
डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या परदेशी जोडीने हैदराबादच्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. ६ षटकाच्या पॉवर प्ले मध्ये त्यांनी ५९ धावांची सलामी दिली.
बंगळुरूने IPL ला दिला सर्वात तरुण खेळाडू; हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात देण्यात आली संधी
जाणून घ्या कोण आहे हा खेळाडू... बंगळुरूने IPL ला दिला सर्वात तरुण खेळाडू
बंगळुरूच्या संघात एकमेव बदल करण्यात आला आहे. नवदीप सैनीच्या जागी १६ वर्षीय प्रयास राय बर्मन याला संधी देण्यात आली आहे. तर हैदराबादच्या संघाने २ बदल केले आहेत. केन विल्यमसनच्या जागी मोहम्मद नबी आंबी शाहबाझ नदीमच्या जागी दीपक हुडाला संघात स्थान मिळाले आहे.
बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.