कर्णधार विराट कोहलीने झळकावलेल्या शतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने, कोलकात्याविरुद्ध सामन्यात २०० धावांचा टप्पा ओलांडला. विराटने ५८ चेंडूत १०० धावा पटकावल्या. कोलकात्याच्या गोलंदाजांची धुलाई करताना विराटने ९ चौकार आणि ४ षटकार लगावले. या खेळीदरम्यान विराटने रैना, धोनी, रोहित, ख्रिस गेल यासारख्या दिग्गज आक्रमक फलंदाजांना मागे टाकत मानाच्या यादीत आपलं अव्वल स्थान भक्कम केलं आहे.
अवश्य वाचा – IPL 2019 : आक्रमक शतकी खेळीसह विराटचा विक्रम, दिग्गज खेळाडूंना टाकलं मागे
आयपीएलमध्ये खेळत असताना एखाद्या संघाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट पहिल्या स्थानावर पोहचला आहे. कोलकात्याविरुद्ध सामन्यातील शतकी खेळीच्या जोरावर विराटने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून ५ हजार धावांचा पल्ला ओलांडला आहे. विराटच्या खात्यावर सध्या ५३२६ धावा जमा आहेत.
दरम्यान कोलकात्याविरुद्ध सामन्यात, कर्णधार या नात्याने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटने ख्रिस गेलला मागे टाकलं आहे. ख्रिस गेलच्या नावावर ३ शतकं जमा आहेत, तर विराटचं कर्णधार या नात्याने हे पाचवं शतक ठरलं आहे. या यादीत मायकल क्लिंगर हा ६ शतकांसह पहिल्या स्थानावर आहे.
Most #IPL runs for one team
5326 – Virat Kohli #RCB
4351 – Suresh Raina #CSK
3671 – MS Dhoni #CSK
3589 – AB de Villiers RCB
3546 – Rohit Sharma #MI
3163 – Chris Gayle RCB
3035 – Gautam Gambhir #KKR
3029 – David Warner #SRH#IPL2019#KKRvRCB— Mohandas Menon (@mohanstatsman) April 19, 2019
याचसोबत आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. कोहलीचं आयपीएलमधलं हे पाचवं शतक ठरलं आहे. कोहलीने डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन, एबी डिव्हीलियर्स यांना मागे टाकलं आहे. या यादीत ख्रिस गेल हा विराटच्या पुढे आहे. गेलच्या नावावर ६ शतकं जमा आहेत.
अवश्य वाचा – IPL 2019 : Universal Boss गेलला विराटचा धोबीपछाड, कर्णधार म्हणून सर्वोत्तम कामगिरीची नोंद