IPL 2019 हा या स्पर्धेचा १२वा हंगाम आहे. आतापर्यंत IPL चे ११ हंगाम झाले. त्यापैकी ७ ते ८ हंगामात विराट कोहली हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचा कर्णधार होता. यंदाही तोच या संघाचा कर्णधार आहे. संघाला एकही IPL विजेतेपद न मिळवून देऊनही त्याला RCB व्यवस्थापनाने अजूनही कर्णधारपदी कायम ठेवले आहे त्याबद्दल खरे पाहता विराटने त्यांचे आभारच मानले पाहिजेत, असा खोचक टोमणा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने विराटला मारला आहे.
IPL च्या इतिहासात ३-३ वेळा संघाला विजेतेपद मिळवून देणारे देखील कर्णधार आहेत. रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांनी आपल्या संघाला ३ वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. त्या दोघांशी मी विराट कोहलीची तुलना बिलकुल करणार नाही. पण विराटच्या नेतृत्वाबाबत बोलताना मला असे वाटते की विराट हा रणनीती आखणारा किंवा झटपट निर्णय घेणारा असा कर्णधार अजिबातच नाही. त्याला अजून कर्णधारपदाबाबत खूप काही शिकण्याची गरज आहे. त्याने अद्याप एकही IPL विजेतेपद जिंकलेले नाही, असे असूनही त्याला RCB ने कर्णधारपदावरून दूर केलेले नाही याबद्दल त्याने RCB चे आभार मानायला हवेत.
IPL 2019 : CSK पडणार Playoffs आधीच स्पर्धेबाहेर – गौतम गंभीर
कर्णधारपदाच्या बाबतीत तो खूपच भाग्यवान आहे. इतर अनेक संघांचे कर्णधार खराब कामगिरीनंतर बदलण्यात आले. पण त्यांच्या संघाकडे कर्णधारपदासाठी फारशी शर्यत नाही. त्यामुळे विराट अद्यापही या संघाच्या कर्णधापदी टिकून आहे, असेही तो म्हणाला. IPL 2019 या स्पर्धेला २३ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या केवळ पहिल्या २ आठवड्यांचेच वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आले असून या स्पर्धेचा पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा रंगणार आहे. माजी कर्णधार विरुद्ध सध्याचा कर्णधार असा सामना असणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.
याशिवाय, IPL २०१९ मध्ये मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स हे चार संघ प्ले ऑफ्स चे सामने खेळतील. या स्पर्धेत एकूण ८ संघ असतात. त्या संघांमध्ये साखळी सामने होतात आणि त्यातून सर्वोत्तम खेळ करणाऱ्या ४ संघाना पुढील फेरीसाठी पात्र ठरण्याचा मान मिळतो. हेच ४ संघ ‘प्ले ऑफ्स’ म्हणजेच बाद फेरीत खेळतात. त्यातदेखील पहिल्या सामन्यात पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचा संघ एकमेकांविरोधात लढतो. त्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरी गाठतो, तर पराभूत संघ तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघात होणाऱ्या विजेत्या संघाशी २ हात करतो. हे ४ संघ म्हणजे मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स हे असतील, असे मतदेखील गौतम गंभीरने व्यक्त केले आहे.