दिल्ली कॅपिटल्सने उत्कृष्ट गोलंदाजीचा नजराणा पेश करत राजस्थान रॉयल्सला ३३ धावांनी मात दिली आहे. आयपीएलच २०२१च्या ३६व्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय राजस्थानच्या गोलंदाजांनी सार्थकी लावला. दिल्लीच्या श्रेयस अय्यरने केलेल्या ४३ धावांच्या जोरावर त्यांना राजस्थानसमोर १५५ धावांचे आव्हान ठेवता आले. प्रत्युत्तरात राजस्थानचे स्टार फलंदाज दबावात फलंदाजी करण्यात अपयशी ठरले. कप्तान संजू सॅमसनने ७० धावा करत झुंज दिली खरी, पण त्याला दुसऱ्या बाजूने कोणीही साथ दिली नाही. दिल्लीने या विजयासह गुणतालिकेत १६ गुण नोंदवल पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजस्थानचा डाव

राजस्थानच्या संघाला सुरुवातीला तीन धक्के बसले आहे. लायम लिविंगस्टोन आणि यशस्वी जैस्वाल झटपट बाद झाले आहेत. त्यामुळे राजस्थानच्या संघावर दडपण आलं आहे. हे दडपण दूर करण्याचा प्रयत्न असताना डेविड मिलर बाद झाला. आता राजस्थानच्या डाव सावरण्याची जबाबदारी कर्णधार संजू सॅमसनच्या खांद्यावर आहे. त्यानंतर आलेले महिपाल लोमरोर आणि रियान परागही मोठी खेळी करू शकले नाही. दिल्लीचा वेगवान गोलंदाज रबाडाने लोमरोरला तर अक्षर पटेलने परागला तंबूत धाडले. अवघ्या ५५ धावांत राजस्थानने आपले ५ गडी गमावले. त्यानंतर कप्तान संजू सॅमसनने आपली झुंज सुरू ठेवली. १५व्या षटकापर्यंत संजूने राजस्थानचा धावफलक ५ बाद ८२ असा केला. १७व्या षटकात सॅमसनने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर मात्र मोठे फटके न खेळता आल्याने राजस्थानचा विजय फार लांबला. संजू ८ चौकार आणि एका षटकारासह ७० धावांवर नाबाद राहिला. २० षटकात राजस्थानला ६ बाद १२१ धावा करता आल्या.

दिल्लीचा डाव

दिल्लीला शिखर धवनच्या रुपाने पहिला धक्का मिळाला. फॉर्मात असलेला शिखर धवन स्वस्तात बाद झाल्याने राजस्थानने आनंद व्यक्त केला. कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर त्रिफाळाचीत झाला. त्याने ८ चेंडूत ८ धावा केल्या. त्यानंतर लगेचच पृथ्वी शॉही तंबूत परतला. चेतन साकारियाच्या गोलंदाजीवर लियाम लिव्हिंगस्टोननं त्याचा झेल घेतला. पृथ्वी शॉने १२ चेंडूत १० धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत जोडीनं संघाचा डाव सावरला. तिसऱ्या गड्यासाठी या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. कर्णधार ऋषभ २४ चेंडूत २४ धावा करून बाद झाला. या खेळीत २ चौकारांचा समावेश आहे. मुस्तफिजुरच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात ऋषभचा अंदाज चुकला आणि त्रिफळाचीत झाला. दिल्लीला श्रेयस अय्यरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र त्यांचा अपेक्षा भंग झाला. राहुल तेवतियाच्या गोलंदाजीवर संजू सॅमसननं त्याला यष्टीचीत केलं. श्रेयसने ३२ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. यात २ षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. दिल्लीला शिम्रॉन हेटमायरच्या रुपाने पाचवा धक्का बसला. हेटमायरने १६ चेंडूत २८ धावा केल्या. यात चौकारांचा समावेश आहे. मुस्ताफिजुरच्या गोलंदाजीवर चेतन साकारियाने त्याचा झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला. हेटमायरनंतर अक्षर पटेलही तंबूत परतला. त्याने ७ चेंडूत १२ धावा केल्या. यात एका उत्तुंग षटकाराचा समावेश आहे. साकारियाच्या गोलंदाजीवर उंच फटका मारल्यानंतर सीमारेषेवर डेव्हिड मिलारनं झेल घेतला. ललित यादव १४ या धावसंख्येवर, तर आर. अश्विन ६ या धावसंख्येवर नाबाद राहिले. राजस्थानकडून साकारिया, मुस्ताफिजुर रहमान यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर कार्तिक त्यागी आणि राहुल तेवतिया यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

आयपीएल २०२१ स्पर्धेत राजस्थान आणि दिल्लीत यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थानने बाजी मारली होती. दिल्लीनं ८ गडी गमवत विजयासाठी १४८ धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान राजस्थाननं ७ गडी गमवून १९.४ षटकात पूर्ण केलं होतं. आयपीएल गुणतालिकेत दिल्लीचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. तर राजस्थानचा संघ पाचव्या स्थानावर आहे. दिल्लीने ९ पैकी ७ सामन्यात विजय मिळवला असून २ सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. तर राजस्थानने ८ पैकी ४ सामन्यात विजय तर ४ सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. आजचा सामना जिंकत दिल्लीला पुन्हा एकदा अव्वल स्थानी पोहोचण्याची संधी आहे. सामना जिंकल्यानंतर दिल्ली प्ले ऑफ मधील आपलं स्थान निश्चित करणारा पहिला संघ ठरणार आहे. जर राजस्थानला या सामन्यात विजय मिळाला तर टॉप ४ मध्ये स्थान मिळणार आहे. राजस्थान आणि दिल्ली या संघात आतापर्यंत २३ सामने झाले असून ११ सामन्यात दिल्ली तर १२ सामन्यात राजस्थानला विजय मिळाला आहे.

राजस्थाननं आज आपल्या संघात दोन बदल केले. डेविड मिलर आणि शम्सीला संघात स्थान देण्यात आलं असून लेविस आणि मॉरिसला आराम दिला आहे. तर दिल्लीने आपल्या संघात एक बदल केला आहे. ललित यादवला संघात स्थान दिलं असून मार्कस स्टॉइनिसला आराम दिला आहे.

दोन्ही संघ

दिल्ली कॅपिटल्स संघ- पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, ललित यादव, शिम्रॉन हेटमायर, अक्षर पटेल, आर. अश्विन, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्किया, आवेश खान

राजस्थान रॉयल्स संघ- यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, डेव्हिड मिलर, लियाम लिव्हिंगस्टोन, महिपाल लोमरोर, रियान पराग, राहुल तेवतिया, चेकन साकारिया, कार्तिक त्यागी, मुस्तफिजूर रहमान, तबरेझ शम्सी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 rajasthan royals vs delhi capitals 36 th match update rmt
First published on: 25-09-2021 at 15:01 IST