गॉड ऑफ क्रिकेटर म्हणून ओळख असलेला भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आजपासून पन्नाशीत पदार्पण करतोय. वयाच्या १६ व्या वर्षापासूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या दिग्गज खेळाडूला जगभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वात यशस्वी ठरलेल्या मुंबई इंडियन्स या फ्रेंचायझीनेही मास्टर ब्लास्टरला एका व्हिडीओच्या माध्यमातून खास शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : नो-बॉलप्रकरणी कारवाई!; दिल्लीच्या पंत, शार्दूलला दंड, तर साहाय्यक प्रशिक्षक अमरे यांच्यावर एका सामन्याची बंदी

सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या सर्वच प्रकारांमधून निवृत्ती घेतलेली असली तरी त्याची क्रेझ अजूनही कायम आहे. लोकांच्या मनावर तो अजूनही राज्य करताना दिसतो. संन्यास घेतलेला असला तरी त्याने क्रिकेटपासून आपली नाळ तुटू दिलेली नाही. सध्या तो मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक म्हणून काम करतोय. त्याच्या प्रशिक्षणाखाली मुंबईचे तरुण आणि नवखे क्रिकेटपटू घडत आहेत. आयपीएल सुरु झाल्यापासूनच सचिन मुंबई इंडियन्स संघाशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे मुंबईने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘त्याने समस्त भारतीयांना क्रिकेट पाहण्याची प्रेरणा दिली’, असे म्हणत मुंबई इंडियन्सने सोशल मीडिया अकाऊंटवर सचिनसाठी एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हेही वाचा >> बीसीसीआयची महत्त्वाची घोषणा, आयपीएल २०२२ च्या अंतिम सामन्याची तारीख-ठिकाण ठरलं, दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसह महिला टी-२० चॅलेंजही जाहीर

या व्हिडीओमध्ये मुंबई इंडियन्सचे तरुण खेळाडू सचिनबद्दल बोलताना दिसत आहेत. सचिनने त्यांना काय काय शिकवलं ? सचिनसोबत वागताना नेमका कोणता अनुभव आला ? सचिनचा स्वभाव कसा आहे ? आदी प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली आहेत. या व्हिडीओमध्ये देवाल्ड ब्रेविस, हृतिक शॉर्दीन, आर्यन जुवल आणि अर्जुन तेंडुलकर यांनी सचिनबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे सचिनसोबत पहिल्यांदा बोलणं झाल्यावर कसं वाटलं याचं तर या खेळाडूंनी खास वर्णन केलं आहे. मुंबई इंडियन्सने ट्विट केलेल्या या व्हिडीओची विशेष चर्चा होत आहे.

हेही वाचा >> VIDEO: कोणाचं काय तर कोणाचं काय… मैदानात ‘नो बॉल’चा वाद सुरु असताना चहल, कुलदीप काय करत होते पाहिलं का?

दरम्यान, सचिन तेंडुलकरने २०१३ मध्ये क्रिकेटमधून संन्यास घेतल्याचे जाहीर केले. सचिनने आपल्या कारकीर्दीत ६६४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये ३४ हजार ३५७ धावा करुन विक्रम केला आहे. तसेच त्याने १०० शतकं आणि १६४ अर्धशतकं झळकावली. तसेच, गोलंदाजीतही त्याने आपली जादू दाखवत २०१ विकेट्स घेतलेले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 mumbai indians special wishes to sachin tendulkar on his birthday prd
First published on: 24-04-2022 at 15:35 IST