IPL 2022 : धक्कादायकच..! रोहितच्या ‘विश्वासू’ खेळाडूला मुंबई इंडियन्स दाखवणार संघाबाहेरचा रस्ता!

‘तो’ निर्विवादपणे मुंबई इंडियन्सचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे, असं असूनही…

ipl 2022 mumbai indians unlikely to retain suryakumar yadav
नीता अंबानी आणि रोहित शर्मा

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मोठी घडामोड घडणार आहे. आता पुढील वर्षासाठी मेगा ऑक्शन होणार असून अनेक स्टार खेळाडू वेगळ्या संघांकडून खेळताना पाहायला मिळणार आहेत. फ्रेंचायझी या महिन्यात त्यांच्या कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करणार आहेत. ३० नोव्हेंबरच्या अंतिम मुदतीपूर्वी, असे अनेक अहवाल आणि दिग्गजांची मते समोर येऊ लागली आहेत, जे सूचित करतात की फ्रेंचायझी कोणते खेळाडू ठेवू शकते आणि कोणते खेळाडू मेगा ऑक्शनसाठी निवडले जातील.

इंडियन एक्स्प्रेसमधील एका वृत्तात आश्चर्यकारकपणे नमूद करण्यात आले आहे, की सूर्यकुमार यादव हा अशा खेळाडूंपैकी एक आहे, ज्याला मुंबई इंडियन्सकडून कायम ठेवले जाणार नाही. अहवालात असेही म्हटले आहे की दोन नवीन फ्रेंचायझींपैकी एकाने (अहमदाबाद आणि लखनऊ) मेगा ऑक्शनपूर्वी सूर्यकुमारशी संपर्क साधला आहे. सूर्यकुमार हा निर्विवादपणे मुंबई इंडियन्सचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. २०१८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून फ्रेंचायझीमध्ये सामील झाल्यानंतर, सूर्यकुमार लीगमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी खूप चांगला खेळाडू ठरला आहे.

सूर्यकुमार चार हंगामांपासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे. सूर्यकुमारने प्रत्येक मोसमात ३०० हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने त्या चार मोसमात मुंबई इंडियन्ससाठी ३० पेक्षा जास्त सरासरी आणि १३५ च्या स्ट्राइक रेटने १७३३ धावा केल्या आहेत. मुंबईकडून खेळताना त्याच्या नावावर टी-२० लीगमध्ये १० अर्धशतकेही आहेत.

हेही वाचा – IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सकडून ‘दिग्गज’ खेळाडूला डच्चू; कॅप्टन पंतसह ‘या’ मुंबईकर खेळाडूला…

मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे खेळाडू कायम ठेवण्याच्या यादीत अव्वल आहेत. रोहित त्यांचा कर्णधार आहे आणि बुमराह हा टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे. या दोघांनाही मुंबई इंडियन्सकडून कायम ठेवण्याची खात्री आहे, तर वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डशी चर्चा सुरू आहे. इशान किशन हा या यादीतील चौथा खेळाडू आहे, मात्र त्याला कायम ठेवण्याचा निर्णय अद्याप अंतिम झालेला नाही.

हार्दिक पंड्या, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डी कॉक, राहुल चहर इत्यादी खेळाडूंना नवीन हंगामापूर्वी लिलावात उतरवले जाईल. सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि ट्रेंट बोल्ट सारखे खेळाडू चर्चेत राहतील आणि लिलाव सुरू होण्यापूर्वी दोन नवीन फ्रेंचायझींना प्रत्येकी तीन खेळाडूंना करारबद्ध करण्याचा परवाना देण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ipl 2022 mumbai indians unlikely to retain suryakumar yadav adn

ताज्या बातम्या