Nitish Rana Injured: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा हंगाम सुरू होण्यापूर्वी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. पाठीच्या दुखापतीमुळे संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर या संपूर्ण मोसमातून बाहेर पडणे जवळपास निश्चित असतानाच, या मोसमात संघाचा भाग असलेला वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला दुखापत झाल्याची बातमीही समोर आली आहे. त्याचबरोबर केकेआर संघाच्या फलंदाजीचा एक भाग असलेला नितीश राणालाही सराव सत्रादरम्यान दुखापत झाली आहे.
नितीश राणाच्या डाव्या गुडघ्याला दुखापत –
कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या खेळाडूंनी घरचे मैदान ईडन गार्डन्सवर सराव सुरू केला आहे, ज्यामध्ये आतापर्यंत संघातील अनेक महत्त्वाचे खेळाडू सामील झाले आहेत. स्पोर्ट्सकीडा वेबसाईटच्या बातमीनुसार, सराव सत्रादरम्यान नितीश राणाच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना राणाला दुखापत झाली आहे.
नितीश राणाने प्रथम एका नेटमध्ये वेगवान गोलंदाजांचा सामना केला, तर दुसऱ्या बाजूला फिरकी गोलंदाजांचा सामना केला. त्यानंतर तो थ्रो-डाऊनसमोर सराव करण्यासाठी जात असताना, त्याचवेळी त्याच्या डाव्या गुडघ्याला चेंडू लागला. यानंतर नितीशला तत्काळ मैदानाबाहेर काढण्यात नेण्यात आले. त्यानंतर त्याने पुढील सरावात भाग घेतला नाही.
केकेआर आपल्या मोहिमेची सुरुवात पंजाबविरुद्ध करणार –
आयपीएलच्या आगामी हंगामात, कोलकाता नाईट रायडर्स संघ आपला पहिला सामना पंजाब किंग्ज संघाविरुद्ध खेळणार आहे. हा सामना १ एप्रिल रोजी मोहालीच्या मैदानावर होणार आहे. यानंतर संघ ६ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध घरच्या मैदानावर दुसरा सामना खेळेल. केकेआरच्या संघाला श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत आपल्या संघाच्या नवीन कर्णधाराची घोषणा करायची आहे, ज्यामध्ये नितीश राणा व्यतिरिक्त सुनील नरेन आणि शार्दुल ठाकूर यांची नावे सध्या आघाडीवर आहेत.
हेही वाचा – Suryakumar Yadav: सूर्या-सॅमसनच्या तुलनेवर कपिल देव यांचे मोठं वक्तव्य; म्हणाले, “सूर्याला जास्त…”
आयपीएल २०२३ साठी केकेआर संघ:
श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रहमानउल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टीम साऊदी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंग, नारायण जगताप, नारायण वायदे, हर्षित राणा. अरोरा, सुयश शर्मा, डेव्हिड वाईज, कुलवंत खेजरोलिया, मनदीप सिंग, लिटन दास, साकिब अल हसन.