CSK Completes 1 Crore Twitter Followers: महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने आता आणखी एक टप्पा गाठला आहे, जो याआधी कोणत्याही आयपीएल संघाला गाठता आला नव्हता. आतापर्यंत, इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वाधिक विजेतेपदे जिंकण्याच्या बाबतीत एमआयसह सीएसके पहिल्या स्थानी आहे. आता सीएसके संघाने एक नवा विक्रम केला आहे. सीएसकेच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने १० दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. याबाबत सीएसकेने एक व्हिडीओ शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या सर्व १० फ्रँचायझींपैकी चेन्नई सुपर किंग्सने हे पहिले स्थान मिळवले आहे. या मागचे सर्वात मोठे कारण संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी मानले जात आहे. ज्याची झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असल्याचे दिसतात. याच कारणामुळे त्याच्या टीमबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही तीच क्रेझ पाहायला मिळत आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाचे ट्विटरवर १० दशलक्ष (१ कोटी) फॉलोअर्स झाल्याची माहिती फ्रँचायझीच्या वतीने एक व्हिडिओ पोस्ट करून देण्यात आली. यामध्ये त्याने सर्व चाहत्यांचे आभारही मानले आहेत. सर्वांच्या नजरा आता पुढील आयपीएल सीझनवर खिळल्या आहेत, ज्यामध्ये धोनी नक्कीच संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

हेही वाचा – Shreyas Iyer: गरीब मुलाला पाहून श्रेयस अय्यरच्या मनाला फुटला पाझर, ‘या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फॉलोअर्सच्या बाबतीत मुंबई इंडियन्स दुसऱ्या स्थानावर –

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर फॉलोअर्सच्या संख्येच्या बाबतीत, जिथे चेन्नई सुपर किंग्स पहिल्या स्थानावर आहे. दुसरीकडे, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारी मुंबई इंडियन्स दुसऱ्या स्थानावर आहे. ट्विटरवर एमआयचे सध्या ८.२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आहे, ज्यांच्या फॉलोअर्सची संख्या ६.८ दशलक्ष आहे. कोलकाता नाईट रायडर्स ५.२ दशलक्ष फॉलोअर्ससह चौथ्या स्थानावर आणि सनरायझर्स हैदराबाद ३.२ दशलक्ष फॉलोअर्ससह पाचव्या स्थानावर आहे.