Virat Kohli Funny Reaction Video Viral : वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या आयपीएल २०२४च्या २५व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ७ गडी राखून पराभव केला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली बॅटने काही खास करु शकल नाही. पण विराट कोहलीच्या एका मजेशीर कृतीने वानखेडे स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांना हसायला भाग पाडले. विराट कोहलीने अचानक भर सामन्यात आपले दोन्ही कान पकडले. विराट कोहलीच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

कोहलीने सामन्यात अचानक आपले दोन्ही कान पकडले –

प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी १९७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघाने चांगली सुरुवात केली. मुंबई इंडियन्सने ८.४ षटकात एकही विकेट न गमावता १०१ धावा केल्या होत्या. यानंतर सूर्यकुमार यादवने १९ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. शेवटी कर्णधार हार्दिक पंड्याने ६ चेंडूत नाबाद २१ धावा करत मुंबई इंडियन्सला सहज विजय मिळवून दिला. सामन्यादरम्यान, जेव्हा कोहली लाँग ऑफवर क्षेत्ररक्षण करत होता, तेव्हा प्रेक्षक काहीतरी बोलले ज्यामुळे विराटने आपले दोन्ही कान पकडले.

विराटने चाहत्यांना हसायला पाडले भाग –

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांची धुलाई होत असताना, प्रेक्षकांचा एक गट ‘कोहलीला गोलंदाजी करू द्या’ असे ओरडू लागला. विराट कोहली त्यावेळी लाँग ऑफमध्ये क्षेत्ररक्षण करत होता. यानंतर चाहत्यांच्या या मागणीवर विराट कोहलीने हसत हसत आपले दोन्ही कान पकडले आणि गोलंदाजी न करण्याचे संकेत दिले. यानंतर विराट कोहलीने हात हलवून प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारले. विराट कोहलीच्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

हेही वाचा – MI vs RCB : जसप्रीत बुमराहला नेट्समध्ये खेळायला घाबरतो सूर्यकुमार यादव, स्वत:च केला खुलासा; म्हणाला तो…

मुंबईने आरसीबीचा केला पराभव –

जसप्रीत बुमराहच्या पाच विकेटनंतर सूर्यकुमार यादव आणि इशान किशनच्या स्फोटक खेळीच्या जोरावर मुंबईने आरसीबीचा ७ विकेट्सनी पराभव केला. मुंबईसाठी, बुमराहने एकट्याने किल्ला राखताना अतिशय अचूक गोलंदाजी केली आणि त्याचे वेगळेपणही अप्रतिम होते. अचूक यॉर्कर्स आणि बाऊन्सरने त्याने फलंदाजांना खूप त्रास दिला.

हेही वाचा – MI vs RCB : जसप्रीत बुमराह फलंदाजांसाठी इतका धोकादायक का आहे? आपल्या यशाचे गुपित स्वत:च केले उघड

यानंतर इशान किशनने अवघ्या ३४ चेंडूंत ७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६९ धावा केल्या. त्याचवेळी, सूर्यकुमार यादवने १९ चेंडूंत ५२ धावांची खेळी खेळली. ज्यात ४ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता. आरसीबीने दिलेले १९७ धावांचे लक्ष्य मुंबई इंडियन्सने १५.३ षटकांत पूर्ण केले. इशान किशनने मोहम्मद सिराजच्या दुसऱ्याच षटकात तीन षटकार आणि एक चौकारासह २३ धावा करत मुंबई इंडियन्सचा आक्रमक फलंदाजीची झलक दाखवून दिली.