Jason Behrendorf reacts on Rohit Sharma form: आयपीएल २०२३ मध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पार पडला. या सामन्यात एमआयने आरसीबीचा ६ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर या विजयाच्या जोरावर गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले. या सामन्यात मुंबई जरी विजय मिळवला असला, तरी संघाच्या कर्णधाराला फलंदाजीमध्ये अद्याप सूर गवसलेला नाही. अशात संघाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फने रोहित शर्माच्या फॉर्मवर प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ याच्या मते रोहित शर्मा पुन्हा फॉर्ममध्ये येण्यापासून काही शॉट्स दूर आहे. त्याच्या मते, रोहित एक उत्कृष्ट खेळाडू आहे आणि तो नेटमध्येही चांगली फलंदाजी करतो. रोहित शर्मा सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. गेल्या ५ सामन्यात त्याने केवळ १२ धावा केल्या आहेत. मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर आरसीबीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याला केवळ ७ धावा करता आल्या आणि तो बाद झाला. तो पुढे जाऊन वानिंदू हसरंगाला शॉट्स मारण्याच्या प्रयत्नात होता, पण चेंडू सरळ त्याच्या पॅडला लागला आणि त्यानंतर त्याला डीआरएसमध्ये बाद घोषित करण्यात आले.

जेसन बेहरेनडॉर्फ यांनी आशा व्यक्त केली –

सामन्यानंतर, मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फने रोहित शर्माचे कौतुक केले आणि म्हणाला, “मला रोहितचा हेतू आवडतो, त्याने जमिनीवर पाय टेकून आडव्या हाताने गोलंदाजांचा सामना केला, जे पाहणे खरोखर चांगले होते. तो नेटमध्ये चांगला चेंडू मारत आहे, पण त्याचा परिणाम सध्या दिसत नाहीये. पण, आम्हाला माहित आहे की रोहित किती चांगला खेळाडू आहे. तो एक संपूर्ण श्रेणीचा खेळाडू आहे आणि त्याला खरोखर चांगल्या फॉर्ममध्ये परत येण्यासाठी काही चांगल्या शॉट्सची आवश्यकता असू शकते.”

हेही वाचा – MI vs RCB: ‘त्याची फलंदाजी गल्ली क्रिकेटची…’; सूर्याच्या वादळी खेळीचे सुनील गावसकरांकडून कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्पर्धा कठीण झाली आहे –

जेसन बेहरेनडॉर्फने या सामन्यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेचाही उल्लेख केला आणि सांगितले की, “यंदाची स्पर्धा खूपच खडतर आहे. हा विजय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता हे नक्की. त्यामुळे आशा आहे की आम्ही ही गती कायम ठेवली पाहिजे. सध्या आम्हाला अजून पुढे तीन महत्त्वाचे सामने खेळायचे आहेत.” दरम्यान, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिडसह अन्य खेळाडूंवर त्याने विश्वास व्यक्त केला.