Akash Chopra’s reaction on Hardik Pandya : गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२२ जिंकली. यानंतर गुजरात टायटन्स आयपीएल २०२३ मध्ये उपविजेती ठरली. पण या मोसमात हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचे कर्णधार आहे. वास्तविक, अलीकडेच मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड केले होते. मात्र, या मोसमात आतापर्यंत हार्दिक पंड्याची कामगिरी मुंबई इंडियन्ससाठी निराशाजनक ठरली आहे. यावर आता माजी भारतीय खेळाडू आकाश चोप्राने प्रतिक्रिया दिली आहे.

फलंदाजी आणि गोलंदाजीशिवाय या खेळाडूने आपल्या कर्णधारपद भूषवतानाही निराशा केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत मुंबई इंडियन्सला केवळ २ विजय मिळाले आहेत, तर ४ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र, माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राचे हार्दिक पंड्यावरील ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आकाश चोप्राने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “कदाचित आतापर्यंत मुंबई इंडियन्सला हार्दिक पंड्याचा फायदा झाला नसेल, पण गुजरात टायटन्स हार्दिक पंड्याशिवाय संघर्ष करत आहे.”

हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सचा भाग असता तर कदाचित या संघाने एवढा संघर्ष केला नसता, असे आकाश चोप्राचे मत आहे, परंतु हार्दिक पांड्याच्या उपस्थितीचा लाभ मुंबई इंडियन्सला मिळू शकला नाही. आकाश चोप्राचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.

हेही वाचा – IPL 2024: ‘तू वेडा आहे का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO

पॉइंट टेबलमध्ये हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्स कुठे आहे?

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स ६ सामन्यांत ४ गुणांसह नवव्या स्थानावर आहे. आतापर्यंत या संघाने फक्त दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध विजय मिळवला आहे, परंतु गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्याविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई इंडियन्सच्या सलग पराभवानंतर हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.