आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २२ व्या सामन्यात सलग चार पराभवानंतर चेन्नईला मंगळवारी पहिला विजय मिळाला. कर्णधार रविंद्र जाडेजाने हा विजय त्याची पत्नी आणि संघातील इतर खेळाडूंना समर्पित केला आहे. या सामन्यात चेन्नईने बंगळुरुसमोर २१६ धावांचा डोंगर उभा केला होता. रॉबिन उथप्पा, शिवम दुबे तसेच माहीश तिक्षाणा यांनी या सामन्यात नेत्रदीपक कामगिरी केली. मात्र या सामन्यात अंबाती रायडू याचीदेखील चांगलीच चर्चा होत आहे. त्याने थेट हवेत झेप घेत अफलातून झेल टिपल्यामुळे त्याचे कौतूक केले जात आहे.

हेही वाचा >> IPL ची मॅच राहिली बाजूला, भर मैदानात डेव्हिड वॉर्नरने केला ‘श्रीवल्ली’ डान्स

चेन्नईचा खेळाडू अंबाती राडयूने टिपलेला झेल या हंगामातील सर्वात अप्रतिम झेल असल्याचे म्हटले जात आहे. बंगळुरुला २७ चेंडूंमध्ये ७१ धावांची गरज असताना दिनेश कार्तिक आणि आकाश दीप मैदानात फलंदाजी करत होते. विजय हवा असेल तर चेन्नईला ही जोडी तोडवी लागणार होती. याच वेळी सोळाव्या षटकात अंबाती रायडूने आपली जादू दाखवली. रविंद्र जाडेजाने टाकलेल्या चेंडूवर आकाशदीपने फटका मारल्यानंतर हवेत उडालेला चेंडू अंबाती रायडूने चपळाईने टिपला. हा झेल टिपण्यासाठी त्याल हवेत उंच झेप घ्यावी लागली.

हेही वाचा >> कर्णधार म्हणून मिळालेला पहिला विजय जाडेजाने पत्नीला केला समर्पित, म्हणाला, माझ्या…

अंबाती रायडू ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाचा आहे. मात्र त्याने अत्यंत चपळाईने हवेत झेप हेत आकाश दीपचा झेल टिपला. ज्यामुळे आकाश दीपला शून्यावर बाद व्हाव लागलं. या सामन्यात बंगळुरुला वीस षटकांत फक्त १९३ धावा करता आल्या.