ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपूट डेव्हिड वॉर्नरचे (David Warner) भारतप्रेम तर सगळ्यांनाच माहिती आहे. बॉलिवूडच्या गाण्यांचेही त्याला वेड आहे. डेव्हिड वॉर्नर हा (IPL) आयपीएलमध्ये असलेल्या SRH संघात जेव्हा खेळत होता, तेव्हा पासून तो टॉलीवूडचा एक चाहता झाला असं म्हणायला हरकत नाही. सोशल मीडियावर तो नेहमीच टॉलीवूडमधील अनेक गाण्यांवर डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करताना दिसतो. आता वॉर्नरने दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा’मधील (Pushpa) श्रीवल्ली (Srivalli) आणि सामी सामी (Sami Sami) या गाण्याची हूक स्टेप चक्क मैदानात केली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

डेव्हिड वॉर्नरने त्याचा हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि केकेओर विरुद्ध सुरु असलेल्या सामन्या दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांना श्रीवल्ली आणि सामी सामी या गाण्याची हूक स्टेप करून दाखवत आहे. त्याचा हा व्हिडीओ शेअर करत डेव्हिड तुमचा काय विचार आहे? चाहत्यांनी विनंती केल्यामुळे…#pushpa असे कॅप्शन डेव्हिडने दिले आहे.

आणखी वाचा : “मुस्लिमांनी प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेला मतं द्यायला हवीत, ओवेसी आणि आझमी…”; केआरकेचं ट्वीट चर्चेत

आणखी वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रस्थान असलेला शरद पवार यांचा ‘सिल्व्हर ओक’ बंगला आतून कसा दिसतो, पाहा फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या आधी देखील डेव्हिडने पुष्पा या चित्रपटातील गाण्यावर डान्स करत व्हिडीओ शेअर केले होते. हे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसली होती.