Mumbai Indians Latest News Update : आयपीएलच्या १६ व्या सीजनला सुरुवात होऊन काही दिवस उलटले आहेत. परंतु, इतक्या कमी कालावधीत अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने टूर्नामेंटमधून बाहेर झाले आहेत आणि त्यांच्या जागेवर नवीन खेळाडू मेगा लीगमध्ये एन्ट्री करत आहेत. नुकतच मुंबई इंडियन्सने वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन टूर्नामेंटमधून बाहेर झाल्याची घोषणा केली होती. त्याच्या जागेवर ऑस्ट्रेलियाचा युवा गोलंदाज रायली मेरेडिथला स्क्वॉडमध्ये सामील करण्यात आलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रायली मेरेडिथ लीगमध्ये सामील होऊन मुंबई इंडियन्सच्या स्क्वॉडमध्ये सामील झाला आहे. त्याने तयारी सुरु केली असून याबाबत फ्रॅंचायजीने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. झाय रिचर्डसन आयपीएल २०२३ सुरु होण्यापूर्वीच दुखापतीमुळं त्रस्त होता. टूर्नामेंटमधून बाहेर जाण्याबाबत रिचर्डसनविषयी आधीपासूनच चर्चा होती. आता मेरेडिथचा त्याच्या जागेवर स्क्वॉडमध्ये समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारी फ्रॅंचायजीने या वेगवान गोलंदाजाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मेरेडिथ वानखेडे स्टेडियममध्ये टीमच्या अभ्यास सत्रात सामील झाला आणि त्यादरम्यान तो खूप खूश झाला असल्याचं समोर आलं.

नक्की वाचा – १० एप्रिलपासून पंजाब किंग्ज करणार धमाका? मैदानात उतरणार ‘हा’ धाकड फलंदाज, तब्बल ११ कोटी रुपये मोजले

मुंबई इंडियन्सने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. रायली अवली कोली आला रे.. असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. मेरेडिथने त्यांच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये आतापर्यंत ५ टी-२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ९.९८ च्या इकॉनमी रेटने ८ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये २६ वर्षीय हा गोलंदाज २०२१ मध्ये पंजाब किंग्जकडून खेळत होता. आयपीएल करिअरमध्ये मरेडिथने १३ सामन्यांमध्ये ९ च्या इकॉनॉमीने १२ विकेट्स घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australian pace bowler riley meredith joins mumbai indians squad watch video of bowling training on instagram nss
First published on: 08-04-2023 at 15:05 IST