BCCI Social Media Restrictions: गेल्या आठवड्यात, आयपीएल २०२४ दरम्यान, भारताच्या एका माजी फलंदाजाने समालोचन करताना स्वतःचा एक फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर लगेचच बीसीसीआयच्या कर्मचाऱ्याने त्याला तो फोटो काढून टाकण्यास सांगितले. सामन्याच्या दिवशी समालोचकांनी स्टेडियमच्या कोणत्याही भागातून फोटो पोस्ट करू नयेत याची खात्री करणे, हे त्यांचे काम आहे. मात्र, जवळपास दहा लाख फॉलोअर्स असलेल्या समालोचकाने फोटो काढण्यास नकार दिला होत. परंतु वारंवार विनंती केल्यानंतर त्यानी फोटो काढून टाकला.

आयपीएल सामन्यादरम्यान एका समालोचकाने सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट केलेल्या अलीकडील घटनांचे हे एक उदाहरण आहे. नियमांचे उल्लंघन करून प्रसारण हक्क धारकांना त्रास दिला होता. त्याचबरोबर आयपीएल सामन्याच्या ठिकाणावरून एका समालोचकाच्या इंस्टाग्राम लाइव्ह पोस्टला दहा लाख व्ह्यूज मिळाले होते. त्याचबरोबर लाइव्ह मॅचच्या व्हिडिओ क्लिप पोस्ट केल्याबद्दल आयपीएल टीमला ९ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Sunil Gavaskar and Kevin Pietersen criticizes Hardik
IPL 2024: मुंबईच्या पराभवानंतर सुनील गावसकर हार्दिकवर संतापले; म्हणाले, ‘मी खूप दिवसांनी इतकी वाईट…’
What Mahesh Manjrekar Said About Veer Savarkar Film
Exclusive : ‘वीर सावरकर’ चित्रपट का सोडला? अखेर महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “रणदीप हुड्डाने…”
After Virat Kohli Fight why Gautam Gambhir fiercely argue With Umpire
विराट कोहलीचा वाद संपेपर्यंत गौतम गंभीर भडकला; श्रेयसने इशारा करताच पंचांशी भिडला, पण झालं काय? पाहा Video
Jalal Yunus Says Mustafizur Rahman has nothing to learn in IPL
‘IPLमध्ये शिकण्यासारखे काहीच नाही…,’ मुस्तफिझूरला परत बोलावल्यानंतर BCB अध्यक्षांचे चकित करणारे वक्तव्य

नियम मोडल्यास कारवाई केली जाणार –

आयपीएलचे प्रसारण हक्क टेलिव्हिजनसाठी स्टार इंडियाकडे आणि डिजिटलसाठी वायाकॉम 18 कडे आहेत. ‘लाइव्ह मॅच’ आणि ‘फिल्ड ऑफ प्ले’ सामग्रीवर त्यांची मक्तेदारी आहे. बीसीसीआयने आता कठोर कारवाई केली आहे. त्याचबरोबर सर्व समालोचक, खेळाडू, आयपीएल मालक आणि सर्व फ्रँचायझींच्या सोशल मीडिया आणि सामग्री संघांना सूचित केले आहे की नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल.

हेही वाचा – MI vs CSK : चेन्नईविरुद्धच्या ‘लाइव्ह मॅच’मध्ये मुंबईच्या बाउचर, पोलार्ड आणि डेव्हिडने पंचांशी घातला वाद, पाहा VIDEO

फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्यावर बंदी का?

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार बीसीसीआय आणि अधिकृत प्रसारक व्यक्ती किंवा संघांना सामन्याच्या दिवशी फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करून सोशल मीडिया फॉलोअर्स मिळवण्यापासून रोखू इच्छितात. आयपीएल संघांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. मात्र, आयपीएल संघांना सामन्याचे फुटेज किंवा व्हिडीओ घेण्याची आणि ते थेट त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करण्याची परवानगी नाही, परंतु सामन्याच्या दिवशी मर्यादित संख्येने पोस्ट करू शकतात. संघांना बीसीसीआय किंवा आयपीएलने सोशल मीडियावर पोस्ट केलेली सामग्री पुन्हा पोस्ट करण्याची परवानगी आहे, तसेच समालोचक आणि खेळाडूंनाही तसे करण्याची परवानगी आहे.

हेही वाचा – IPL 2024: मुंबईच्या पराभवानंतर सुनील गावसकर हार्दिकवर संतापले; म्हणाले, ‘मी खूप दिवसांनी इतकी वाईट…’

आयपीएलच्या हक्कांसाठी ब्रॉडकास्टर्सने मोठी रक्कम दिली –

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “ब्रॉडकास्टर्सने आयपीएलच्या हक्कांसाठी मोठी रक्कम दिली आहे. त्यामुळे समालोचक सामन्याच्या दिवशी व्हिडीओ किंवा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करू शकत नाहीत. समालोचकांनी ‘इन्स्टाग्राम लाइव्ह’ केले किंवा फील्डमधून फोटो पोस्ट केल्याची उदाहरणे आहेत. एका व्हिडीओला दहा लाख व्ह्यूज मिळाले आहेत. आयपीएल संघ देखील लाइव्ह मॅचचे व्हिडिओ पोस्ट करू शकत नाहीत. ते मर्यादित संख्येने फोटो पोस्ट करू शकतात. तसेच त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह मॅचचे अपडेट देऊ शकतात. दोषी आढळल्यास फ्रँचायझीला दंड ठोठावला जाईल.”