Chennai Super Kings vs Gujarat Titans Qualifier 1 Match Today: आयपीएल २०२३ चा पहिला क्वालिफायर सामना आज (२३ मे) चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. गुजरात टायटन्सने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जचा संघ दुसऱ्या क्रमांकावर होता. सीएसके आयपीएल २०२३ ची ट्रॉफी जिंकू शकते. आकडेवारी याची साक्ष देत आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया.

सीएसके आयपीएल ट्रॉफी जिंकू शकते –

सीएसकेने २०११, २०१८ आणि २०२१ मध्ये विजेतेपद पटकावले आहे. या तीनही हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर राहिला होता. या हंगामातही सीएसके गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. संघाने १४ पैकी ८ सामने जिंकले आहेत आणि फक्त ५ सामने गमावले आहेत. सीएसके संघासाठी गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर राहणे नेहमीच फायदेशीर ठरले आहे. दुसऱ्या क्रमांकावर असताना त्यानी तीन वेळा ट्रॉफी जिंकली आहे. अशा स्थितीत सीएसके संघ यंदाच्या आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरू शकतो.

असा आहे क्वालिफायरमधील विक्रम –

चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत आयपीएल क्वालिफायरमध्ये ६ सामने खेळले आहेत, त्यापैकी ४ जिंकले आहेत. त्याचबरोबर २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दोन्ही वेळा मुंबई इंडियन्सने त्याना हरवले आहे. आयपीएल २०२३ च्या क्वालिफायर-१ मध्ये गुजरात टायटन्ससाठी माही सेनेचे आव्हान अजिबात सोपे असणार नाही.

हेही वाचा – “बृजभूषण सिंह यांच्यामुळे मी देखील इतर महिला मल्लांप्रमाणे शांत होते, पण आता…” विनेश फोगाट आक्रमक

प्लेऑफमध्येही अशीच कामगिरी होती –

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाने आतापर्यंत चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघ १२व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. १२ पैकी या संघाने ९ वेळा अंतिम फेरी गाठली आहे. चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल प्लेऑफमध्ये २४ सामने खेळले आहेत, त्यापैकी १५ जिंकले आहेत. त्याचवेळी २०१४ मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते.

हेही वाचा – Video: चेन्नईच्या मैदानात गुरु-शिष्य येणार आमनेसामने, पण हार्दिक पांड्या म्हणाला, “धोनीचा तिरस्कार करण्यासाठी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीएसकेची आयपीएलमधील आतापर्यंतची कामगिरी –

वर्ष २००८ – अंतिम फेरीत पराभूत
वर्ष २००९ – उपांत्य फेरीत हरले
वर्ष २०१० – विजेतेपद पटकावले
वर्ष २०११ – विजेतेपद पटकावले
वर्ष २०१२ – अंतिम फेरीत पराभूत
वर्ष २०१३ – अंतिम फेरीत पराभूत
वर्ष २०१४ – क्वालिफायर-२ हरले
वर्ष २०१५ – अंतिम फेरीत पराभूत
वर्ष २०१६ – बंदीमुळे संघ खेळला नाही
वर्ष २०१७ – बंदीमुळे संघ खेळला नाही
वर्ष २०१८ – विजेतेपद पटकावले
वर्ष २०१९ – अंतिम फेरीत पराभूत
वर्ष २०२१ – विजेतेपद पटकावले
वर्ष २०२२ – प्लेऑफसाठी पात्र ठरले नाही