scorecardresearch

IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सला मिळाला ऋषभचा बदली खेळाडू ; ‘हा’ युवा यष्टीरक्षक-फलंदाज घेणार पंतची जागा

Abhishek Porel: ऋषभ पंतच्या जागी आयपीएल २०२३ साठी दिल्ली कॅपिटल्सने नवीन खेळाडूंची निवड केली आहे. दुखापतीमुळे पंत यंदाच्या मोसमात खेळणार नाही.

Abhishek Porel to replace Rishabh Pant for ipl 2023
ऋषभ पंत (फोटो- संग्रहित छायाचि

Abhishek Porel to replace Rishabh Pant for IPL 2023: आयपीएलच्या १६वा हंगाम सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमधून मोठी बातमी समोर आली आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ऋषभ पंतच्या बदली खेळाडूची घोषणा करण्यात आली आहे. ऋषभ पंतच्या जागी बंगालचा यष्टीरक्षक फलंदाज अभिषेक पोरेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार ऋषभ पंत सध्या कार अपघातात झालेल्या दुखापतीतून सावरत आहे. त्याच्या जागी संघाने आगामी हंगामासाठी डेव्हिड वॉर्नरची कर्णधारपदी निवड केली आहे, तर अक्षर पटेलला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

बंगालचा यष्टिरक्षक फलंदाज अभिषेक पोरेलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पीटीआयच्या मते, तो आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे. तो संघात ऋषभ पंतच्या जागा घेईल. २१ वर्षीय पोरेलने १६ प्रथम श्रेणी सामने, तीन लिस्ट ए सामने आणि तीन टी-20 सामने खेळले आहेत. डाव्या हाताच्या फलंदाजाने फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने ३०.२१च्या सरासरीने ६९५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ६ अर्धशतके झळकावली आहेत.

पोरेलने रणजी ट्रॉफीमध्ये बंगालसाठी चांगली कामगिरी केली होती. त्याने ग्रुप स्टेजमध्ये हरियाणाविरुद्ध ४९ धावा केल्या होत्या. उपांत्य फेरीत मध्य प्रदेशविरुद्ध ५१ आणि अंतिम फेरीत सौराष्ट्रविरुद्ध ५० धावा केल्या होत्या. पीटीआयच्या रिपोर्टरनुसार, पोरेलने सराव सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. तो खूप काही शिकू शकणारा तरुण आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सरफराज खान विकेटकीपिंग करताना दिसू शकतो.

हेही वाचा – IPL 2023: टीम इंडियातील स्थानाबद्दल उमेश यादवचे महत्वाचे वक्तव्य; म्हणाला,’वनडे विश्वचषक २०२३…’

कोण आहे अभिषेक पोरेल?

अभिषेक पोरेल हा बंगालचा युवा यष्टिरक्षक फलंदाज आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व करतो. यष्टिरक्षणा व्यतिरिक्त तो डावखुरा फलंदाज आहे. तो गेल्या वर्षी भारताच्या अंडर-१९ विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता. तो अतिशय प्रतिभावान खेळाडू मानला जातो. यापूर्वी, दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी पंतच्या बदलीसाठी काही यष्टीरक्षकांच्या चाचण्या घेतल्या होत्या. त्यात अभिषेक पोरेलचाही समावेश होता. त्यानंतर त्याचा दिल्ली कॅपिटल्सच्या संघात समावेश करण्यात आला.

आयपीएल २०२३ साठी दिल्ली कॅपिटल्स संघ:

अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एनरिक नोरखिया, डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मिचेल मार्श, सरफराज खान, कमलेश नागरकोटी, मुस्तफिजुर रहमान, कुलदीप यादव, खलील अहमद, चेतन साकारिया, ललित यादव, रिपल पटेल, यश धुल, रोवमन पॉवेल, प्रवीण दुबे, लुंगी एनगिडी, विकी ओस्तवाल, अमन खान, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिले रोसौ, अभिषेक पोरेल

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 17:19 IST

संबंधित बातम्या