आयपीएल म्हटलं की गोलंदाजाचं करिअर पणाला लागतं. २० षटकांच्या खेळात फलंदाज आक्रमकपणे मैदानात उतरतात आणि गोलंदाजांची धुलाई करतात. एखादा गोलंदाज चांगली कामगिरीही करतो आणि सामना जिंकून देतो. आतापर्यंत आयपीएलमध्ये तीन सामने झाले आहेत. या तीन सामन्यात मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि सनराइजर्स हैदराबाद या तीन संघाना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई इंडियन्स सोडलं तर चेन्नई आणि हैदराबादने पराभवासाठी गोलंदाजांना कारणीभूत धरलंय. हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने गोलंदाजांच्या प्रदर्शनावर नाराजी व्यक्त केली आहे.

कोलकाताने हैदराबादसमोर ६ गडी गमवून विजयासाठी १८७ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र हैदराबाद संघ ५ गडी गमवून १७७ धावा करू शकला. त्यामुळे आयपीएलमधील पहिला सामना हैदराबादनं १० धावांनी गमावला. असं असलं तरी कर्णधार वॉर्नर यासाठी गोलंदाजांना जबाबदार धरलं आहे.

IPL 2021: पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना

‘मला वाटतं या खेळपट्टीवर जास्त धावा होणं शक्य नाही. कोलकाताच्या संघाने ही रणनिती समजून घेतली आणि चांगल्या धावा केल्या. मात्र आम्ही साजेशी कामगिरी करु शकलो नाहीत. उलट शेवटी आमच्या गोलंदाजांकडून अधिक धावा गेल्या. आमच्या फलंदाजीवेळी दवही हवं तसं पडलं नाही. त्यामुळे फलंदाजी करताना आमच्या संघाला अडचणी आल्या. असं असलं तरी या मैदानात आणखी चार सामने खेळायचे आहेत. यातून बोध घेत आम्ही चांगली कामगिरी करू’ असं हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर याने सांगितलं.

‘‘विराटनं बाबर आझमकडून शिकावं’’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दूसरीकडे भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने पराभवाचं खापर फलंदाजांवर फोडलं आहे. त्याने नाव न घेता फलंदाजांवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘फक्त आपले आकडे चांगले करण्याऱ्या फलंदाजांमुळे संघाचं नुकसान होतं.’ असं ट्वीट विरेंद्र सेहवाग याने केलं आहे.

कोलकाताकडून मिळालेल्या पराभवानंतर हैदराबादचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. तर कोलकाताचा संघ गुणतालिकेत दूसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दिल्लीने पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केल्याने त्यांच्या सरासरीत अधिकची वाढ झाली आहे. गुणतालिकेत दिल्लीचा संघ पहिल्या स्थानी आहे. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु तिसऱ्या स्थानी आहे. तर मुंबई इंडियन्स सहाव्या स्थानी आणि चेन्नई सुपर किंग्स आठव्या स्थानी आहे.