आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात लढत होत आहे. चेन्नईचा सलामीवीर रॉबिन उथप्पाने दिमाखदार खेळ करत अवघ्या २७ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या. मात्र उथप्पासोबत सलामीला आलेला ऋतुराज गायकवाड पुन्हा एकदा अपयशी ठऱला असन तो अवघी एक धाव करुन बाद झालाय. याआधीच्या सामन्यातही त्याने खराब प्रदर्शन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याआधी केकेआर विरोधात झालेल्या सामन्यात ऋतुराजने निराशा केली होती. त्याला या सामन्यात खातंदेखील खोलता आलं नव्हतं. त्यामुळे आजच्या सामन्यात ऋतुराज चांगली कामगीरी करुन चेन्नईसाठी मोठं योगदान देईल असा अंदाज बांधला जात होता. मात्र आजदेखील ऋतुराजने सर्वांची निराशा केली. आज ऋतुराज फक्त एक धाव करुन तंबुत परतलाय.

रवी बिश्नोईचा डायरेक्ट हीट

नेमकं काय घडलं ?

आजच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड रॉबिन उथप्पासोबत सलामीला आला होता. सुरुवातीलाच रॉबिन उथप्पाने आक्रमक खेळ करत पहिल्याच षटकात चौकार लगावले. मात्र तिसरे षटक केळताना ऋतुराज चांगलाच गोंधळला. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू ऋतुराजच्या पॅडवर लागला. चेंडू दूर गेल्यानंतर ऋतुराजने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र क्षेत्ररक्षक रवी बिश्नोईच्या हातात चेंडू गेला. बिश्नोईने कशाचाही विलंब न करता चेंडू थेट स्टंप्सवर मारला. क्षेत्ररक्षकाने चेंडू अचूक फेकल्यामुळे ऋतुराज अगदी सहजपणे धावचित झाला.

https://www.iplt20.com/video/41636/bulls-eye-bishnoi-sends-gaikwad-packing

दरम्यान, चेन्नईने आपल्या डावात लखनऊ सुपर जायंट्समोर २११ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. रॉबिन उथप्पाने (५०), मोईन अली (३५), शिवम दुपबे (४९) यांनी चांगला खेळ केला. तर शेवटी ड्वेन ब्राव्हो (१) आणि एमएस धोनी (१६) नाबाद राहिले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 csk vs lsg ruturaj gaikwad run out by ravi bishnoi prd
First published on: 31-03-2022 at 21:43 IST