IPL 2022, DC vs RR Match Updates : इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या (IPL 2022) १५ व्या हंगामातील ३४ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राजस्थान रॉयल्समध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाला. यात राजस्थानने दिल्लीचा पराभव करत १५ धावांनी विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर राजस्थान रॉयल्सने दमदार फलंदाजी करत २० षटकात २ विकेट गमावून २२२ धावांचा डोंगर उभा केला. आता दिल्लीला विजयासाठी २२३ धावांचा पाठलाग करावा लागेल.

दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. आयपीएलमधील हे दोन्ही संघ तुल्यबळ होते. आतापर्यंतच्या आयपीएलच्या सामन्यात या दोन्ही संघांचा एकूण २५ वेळा सामना झालाय. यात दिल्लीने १२ वेळा, तर राजस्थानने १३ वेळा विजय नोंदवला.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Highlights in Marathi
PBKS vs MI Highlights, IPL 2024 : रोमहर्षक सामन्यात मुंबईचा पंजाबवर ९ धावांनी निसटता विजय, आशुतोष शर्माची वादळी खेळी ठरली व्यर्थ
Rajasthan Royals vs Punjab Kings Match Updates in Marathi
PBKS vs RR : रोमहर्षक सामन्यात राजस्थानचा पंजाबवर ३ विकेट्सनी निसटता विजय, शिमरॉन हेटमायरची निर्णायक खेळी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Match UpdateS
IPL 2024 : राजस्थान रॉयल्सचा सलग दुसरा विजय, रोमहर्षक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव
Rajasthan Royals vs Delhi Capitals Match Updates in marathi
IPL 2024 : रियान परागच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानने उभारला धावांचा डोंगर, दिल्लीला दिले १८६ धावांचे लक्ष्य

राजस्थान रॉयल्सची इनिंग

राजस्थानकडून जॉस बटलरने ६५ चेंडूत ११६ धावा केल्या. यात ९ षटकार आणि ९ चौकारांचा समावेश आहे. राजस्थानला पहिला धक्का देवदत्तच्या रुपात भेटला. त्याने ३५ चेंडूत ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. देवदत्तने २ षटकार आणि ७ चौकार लगावले.

बटलर शतकी खेळी करून बाद झाल्यानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने दमदार खेळी केली. सॅमसनने १९ चेंडूत नाबाद ४६ धावा केल्या. यात ३ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश आहे. शिमरोन हेटमायरने १ चेंडूत नाबाद १ धाव काढली.

दिल्ली कॅपिटल्सची इनिंग

दिल्ली कॅपिटल्सकडून पृथ्वी शॉने २७ चेंडूत ३७ धावा केल्या. यात ५ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. डेविड वॉर्नरने १४ चेंडूत २८ धावा केल्या. यात त्याच्या ५ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. सरफराज खानला ३ चेंडूत केवळ १ धाव काढता आली. ऋषभ पंतने ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २४ चेंडूत ४४ धावा केल्या. ललित यादवने २४ चेंडूत ३७ धावा केल्या. यात त्याच्या ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे.

अक्षर पटेल स्वस्तात माघारी गेला. त्याने ४ चेंडूत केवळ एक धाव काढली. रोवमॅन पॉवेलने १५ चेंडूत ३६ धावांची दमदार खेळी केली. यात त्याने ५ षटकार मारले. विशेष म्हणजे शेवटच्या षटकात ६ चेंडूत ३६ धावांची गरज असताना पॉवेलने ३ चेंडूत ३ षटकार मारले. मात्र, खेळात खंड आला आणि त्यानंतर हा फॉर्म तुटला. पॉवेल ३६ धावा करून बाद झाला.

शार्दुल ठाकूरने ७ चेंडूत नाबाद १० धावा केल्या. कुलदीप यादवही नाबाद राहिला. दिल्लीला राजस्थानने दिलेल्या २२३ धावसंख्येचा पाठलाग करताना २० षटकात ८ बाद २०७ धावाच करता आल्या. यासह राजस्थानने दिल्लीला १५ धावांनी पराभूत केलं.

दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सची सर्वाधिक धावसंख्या २०१ राहिली आहे. प्रथम फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सला राजस्थान विरुद्ध ७ सामन्यात विजय मिळाला आहे. याशिवाय ५ वेळा त्यांना धावसंख्येचा पाठलाग करत विजय मिळालाय.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन

पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, सरफराज खान, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), ललित यादव, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मुस्तफिजुर रहमान, कुलदीप यादव, खलील अहमद

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन

जॉस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), शिमरोन हेटमायर, रियान पराग, करुण नायर, रविचंद्रन अश्विन, ओबेद मॅककॉय, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल