PL 2022 GT vs RR Playing XI : आयपीएल २०२२ चे साखळी सामने संपले असून आजपासून प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. आज प्लेऑफच्या पहिल्या सामन्यात अर्थात क्लॉलिफायर-१ मध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन तगडे संघ एकमेकांना भिडतील.

हेही वाचा >>> सामना सुरु असताना छातीत लागलं दुखायला, दिग्गज क्रिकेटपटूला केलं तातडीने रुग्णालयात दाखल

प्लेऑफच्या पहिल्या सामन्यात आज गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेला गुजरात संघ आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेला राजस्थान रॉयल्स यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन या स्टेडियवर लढत होणार आहे. हे दोन्ही संघ या हंगामातील सर्वोत्तम खेळाडू असल्यामुळे आजचा सामना चांगलाच रोमहर्षक होणार आहे. या सामन्यात ज्या संघाचा विजय होईल तो संघ थेट अंतिम सामन्यात पोहोचेल तर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळेल.

हेही वाचा >>> लियाम लिव्हिंगस्टोनने केली कमाल, एका हाताने टीपला अभिषेक शर्माचा अफलातून झेल

गुजरात संघाने १४ पैकी एकूण दहा सामने जिंकले असून फक्त चार सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे. याच कारणामुळे हा संघ राजस्थानपेक्षा सरस असल्याचे म्हटले जात आहे. तर राजस्थानने १४ पैकी ९ सामन्यांमध्ये विजय तर ५ सामन्यांमध्ये पराभ पत्करला आहे. राजस्थान रॉयल्स संघाची पूर्ण मदार जोस बटलर या खेळाडूवर असेल. त्याने आतापर्यंत या हंगामात ६०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यामुळे बटलर आजच्या सामन्यातही चांगली खेळी करेल अशी अपेक्षा आहे. तसेच राजस्थानकडून आर अश्विन, संजू सॅमसन, देवदत्त पडीक्कल या चांगल्या फलंदाजांचीदेखील फळी आहे. म्हणूनच आजच्या सामन्यात राजस्थान संघ पूर्ण ताकतीने मैदानात उतरणार आहे.

हेही वाचा >>> आगामी टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, उमरान मलिक, दिनेश कार्तिकला संधी, विराटला विश्रांती

दुसरीकडे गुजरात संघाकडे चांगले सलामीवीर तसेच राहुल तेवतिया, राशिद खान यांच्यासारखे विजयवीर आहेत. तसेच गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यादेखील या हंगामात धडाकेबाज फलंदाजी करताना दिसतोय. त्यामुळे गुजरात संघदेखील राजस्थानशी पूर्ण ताकतीने दोन हात करणार आहे.

गोलंदाजीबाबत बोलायचं झालं तर राजस्थान रॉयल्सकडे आर अशिन, युझवेंद्र चहल असे दिग्गज फिरकीपटू आहेत. ज्याचा गुजरातला धोका आहे. तसेच या संघाकडे प्रसिध कृष्णा, ट्रेंट बोल्ट यांच्यासारखे कसलेले गोलंदाजदेखील राजस्थानकडे आहेत. तर दुसरीकडे गुजरात संघाकडे राजस्थानच्या तोडीस तोड अशी गोलंदाजांची फौज आहे. या संघाकडे राशीद खान, लॉकी फर्ग्यूसन असे उमदे गोलंदाज आहेत. तसेच मोहम्मद शमीसारखा अनुभवी वेगवान गोलंदाज गुजरातसाठी ही जमेची बाजू आहे.

हेही वाचा >>> फ्रेंच खुली  टेनिस स्पर्धा : क्रेजिकोव्हा, ओसाकाचे आव्हान संपुष्टात ; श्वीऑनटेक,  झ्वेरेव्हची आगेकूच

गुजरात संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद शमी</p>

हेही वाचा >>> चेसेबल मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा : प्रज्ञानंदचे उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के

राजस्थान रॉयल्स संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, ओबेद मॅक्कॉय