IPL 2022, MI vs SRH Match Highlights : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ६५ वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जातोय. या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत हैदराबादला विजय प्राप्त करावा लागणार आहे. मुंबईचा विजय झाला तर हैदराबाद संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. तर दुसरीकडे मुंबई संघ अगोदरच प्लेऑफच्या बाहेर पडलेला आहे. या संघाकडे गमावण्यासारखे काहीही नाही.

Anant Radhika's Pre-Wedding Ceremony Updates in Marathi
MS Dhoni : माही साक्षीसह अनंत राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला रवाना, VIDEO होतोय व्हायरल
Irfan Pathan raise question on BCCI about Hardik Pandya
Team India : ‘हे सर्वांना लागू होत नसेल, तर…’, इरफान पठाणकडून बीसीसीआयच्या केंद्रीय करारावर प्रश्न उपस्थित
kl rahul still not fit likely to miss 5th Test against england in dharamsala
केएल राहुल अजूनही जायबंदीच;अखेरच्या कसोटी सामन्यातही खेळण्याची शक्यता कमीच
Mumbaikars should have a referendum on Mahalakshmi Race Course proposal ex-BJP corporators demand
महालक्ष्मी रेसकोर्सच्या प्रस्तावावर मुंबईकरांचे सार्वमत घ्यावे, भाजपच्या माजी नगरसेवकांची मागणी
Live Updates

IPL 2022, MI vs SRH Live Updates : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यातील प्रत्येक अपडेट एका क्लीकवर

23:46 (IST) 17 May 2022
हैदराबादचा तीन धावांनी विजय

हैदराबादचा थरारक पद्धतीने तीन धावांनी विजय झाला. मुंबईने हा सामना जिंकण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला. मात्र मुंबईला वीस षटके संपेपर्यंत १९० धावा करता आल्या.

23:19 (IST) 17 May 2022
मुंबई इंडियन्सला सातवा मोठा झटका, संजय यादव झेलबाद

मुंबई इंडियन्सला संजय यादवच्या रुपात सातवा मोठा झटका बसला आहे. संजय यादव खातंदेखील खोलू शकला नाही.

23:10 (IST) 17 May 2022
मुंबई इंडियन्सला पाचवा मोठा झटका, ट्रिस्टन स्टब्स धावबाद

मुंबई इंडियन्सला ट्रिस्टन स्टब्सच्या रुपात पाचवा मोठा झटका बसला आहे. ट्रिस्टन स्टब्स २ धावांवर असताना धावचित झाला.

23:05 (IST) 17 May 2022
मुंबई इंडियन्सला चौथा मोठा झटका, डॅनियल सॅम्स झेलबाद

मुंबई इंडियन्सला डॅनियल सॅम्सच्या रुपात चौथा मोठा झटका बसला. सॅम्सला चांगल्या धावा करता आल्या नाही. सॅम्स अवघ्या १५ धावांवार बाद झाला. सध्या मुंबईच्या १४० धावा झाल्या आहेत.

22:53 (IST) 17 May 2022
मुंबई इंडियन्सला तिसरा मोठा झटका, तिलक वर्मा झेलबाद

मुंबई इंडियन्सला तिसरा मोठा झटका बसला आह. तिलक वर्माच्या रुपात मुंबईचा तिसरा खेळाडू बाद झाला आहे. तिलक वर्माने अवघ्या आठ धावा केल्या. सध्या मुंबई इंडियन्सच्या १२३ धावा झाल्या आहेत.

22:37 (IST) 17 May 2022
मुंबई इंडियन्सला दुसरा मोठा झटका, इशान किशन झेलबाद

मुंबई इंडियन्सला इशान किशनच्या रुपात दुसरा झटका बसला आहे. इशान किशनने ४३ धावा केल्या.

22:33 (IST) 17 May 2022
मुंबई इंडियन्सला पहिला मोठा झटका, रोहित शर्मा बाद

मुंबई इंडियन्सला रोहित शर्माच्या रुपात पहिला मोठा झटका बसला आहे. रोहित शर्मा झेलबाद झाला आहे. सध्या मुंबईच्या ९५ धैवा झाल्या आहेत.

22:09 (IST) 17 May 2022
मुंबई इंडियन्सची दमदार सुरुवात, ५० धावा पूर्ण

मुंबई इंडियन्सने दमदार सुरुवात केली आहे. सध्या मुंबईचा एकही गडी बाद झालेला नाही. या संघाच्या ५० धावा पूर्ण झाल्या आहेत.

21:26 (IST) 17 May 2022
मुंबईसमोर १९४ धावांचे लक्ष्य

हैदराबाद संघाने २० षटकांत १९३ धावा केल्या आहेत. आता मुंबईला विजयासाठी १९४ धावा कराव्या लागणार आहेत.

21:14 (IST) 17 May 2022
हैदराबादला पाचवा मोठा झटका, ऐडन मर्कराम २ धावांवर बाद

हैदराबाद संघाला ऐडन मर्करामच्या रुपात पाचवा मोठा झटका बसला आहे. राहुल त्रिपाठी बाद झाल्यानंतर हैदराबादचा संघ ढासळला आहे. मर्कराम फक्त दोन धावा करु शकला आहे. सध्या हैदराबादच्या १८१ धावा झाल्या आहेत.

21:08 (IST) 17 May 2022
हैदराबादला चौथा मोठा झटका, राहुल त्रिपाठी झेलबाद

हैदराबादला राहुल त्रिपाठीच्या रुपात तिसरा मोठा झटका बसला आहे. राहुल त्रिपाठीने ७६ धावा केल्या. राहुल बाद झाल्यामुळे हैदराबादच्या धावफलकाला ब्रेक लागू शकतो.

21:02 (IST) 17 May 2022
हैदराबादला तिसरा मोठा झटका, निकोलस पुरन झेलबाद

सनरायझर्स हैदराबादला तिसरा मोठा झटका बसला आहे. निकोलस पुरनच्या रुपात हैदराबादचा तिसरा फलंदाज बाद झाला आहे. पुरनने ३८ धावा केल्या.

20:45 (IST) 17 May 2022
राहुल त्रिपाठीचे अर्धशतक पूर्ण, हैदराबादच्या १४७ धावा

हैदराबादचा संघ सध्या चांगल्या स्थितीत आहे. राहुल त्रिपाठी चांगली फलंदाजी करत आहे. सध्या त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. तर दुसरीकडे हैदराबादच्या आतापर्यंत १४७ धावा झाल्या आहेत.

20:34 (IST) 17 May 2022
हैदराबादच्या ११५ धावा पूर्ण

हैदराबाद संघ चांगल्या स्थितीत आहे. सध्या या संघाकडून राहुल त्रिपाठी, निकोलस पुरन फलंदाजी करत आहेत. सध्या हैदराबादरच्या ११५ धावा झाल्या आहेत.

20:24 (IST) 17 May 2022
हैदराबादला दुसरा मोठा झटका, प्रियाम गर्ग झेलबाद

हैदराबादला प्रियाम गर्गच्या रुपात दुसरा मोठा झटका बसला आहे. प्रियाम गर्गने ४२ धावा केल्या. तो झेलबाद झाला आहे.

20:03 (IST) 17 May 2022
हैदराबाद संघाच्या ५० धावा पूर्ण

हैदराबाद संघाच्या ५० धावा पूर्ण झाल्या आहेत. सध्या राहुल त्रिपाठी आणि प्रियाम गर्ग मैदानात फलंदाजी करत आहेत.

19:44 (IST) 17 May 2022
हैदराबादला पहिला झटका, अभिषेक शर्मा झेलबाद

सामन्याला सुरुवात झाली असून हैदराबाद संघाला पहिला मोठा झटका बसला आहे. अभिषेक शर्मा अवघ्या ९ धावांवर झेलबाद झाला आहे. सध्या हैदराबादच्या १८ धावा झाल्या आहेत.

19:26 (IST) 17 May 2022
मुंबईने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

18:59 (IST) 17 May 2022
हैदराबाद संघ वानखेडे स्टेडियमकडे रवाना

सनरायझर्स हैदराबाद संघदेखील वानखेडे स्टेडियमकडे रवाना झाला आहे.

18:55 (IST) 17 May 2022
मुंबई संघ वानखेडे स्टेडियमकडे रवाना

मुंबई इंडियन्सचा संघ वानखेडे स्टेडियमकडे रवाना झाला आहे. काही क्षणात आजच्या सामन्याला सुरुवात होणार आहे.

आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होत आहे.

 

rohit sharma and kane williamson

रोहित शर्मा आणि केन विल्यम्सन (संग्रहित फोटो)