आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील १८ वा सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने मुंबई इंडियन्सवर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. मुंबईने दिलेल्या १५१ धावांचे लक्ष्य रॉयल चॅलेजर्स बंगळुरुने आठ गडी राखून गाठले. मुंबईला मोठ्या धावसंख्येपर्यंत घेऊन जाण्यासाठी सूर्यकुमार यादवने मोठी मेहनत घेतली. मात्र बंगळुरुने मुंबईला नमवत विजय संपादन केला. या सामन्यातील पराभवानंतर मुंबईने हा सलग चौथा सामना गमावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Video : बंगळुरुच्या ग्लेन मॅक्सवेलची चपळाई, हवेत उडी घेत तिलक वर्माला केलं शून्यावर धावबाद, पाहा व्हिडीओ

मुंबईने दिलेले १५२ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी बंगळुरुच्या फलंदाजांनी सुरुवातीपासून मोठे फटके मारायला सुरुवात केली होती. सलामीला आलेले फाफ डू प्लेलीस आणि अनुज रावत या जोडीने ५० धावांची भागिदारी केली. त्यानंतर नवव्या षटकामध्ये फाफ डू प्लेलिस उनाडकटने टाकलेल्या चेंडूचा सामना करताना झेलबाद झाला. फाफ डू प्लेलिसने २४ चेंडूंमध्ये १६ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या विराट कोहलीने चांगली फलंदाजी केली. अनुज रावत सुरुवातीपासून मोठे फटके मारत होता. त्याने ४७ चेंडूंमध्ये ६ षटकार आणि २ चौकार लगावत ६६ धावा केल्या. तर विराट कोहलीनेही ३६ चेंडूंमध्ये ५ चौकारच्या जोरावर ४८ धावा केल्या. या दोघांच्या फटकेबाजीमुळे बंगळुरुचा विजय आणखी सोपा झाला.

हेही वाचा >>> IPL 2022, RCB vs MI : मुंबईचा सूर्यकुमार तळपला, चाहते म्हणतात ‘एकच वादा सूर्या दादा,’ मैदानातील पोस्टर्स व्हायरल

शेवटी २० चेंडूंमध्ये २२ धावा अशी स्थिती असताना अनुज रावत ६६ धावांवर धावबाद झाला. त्यानंतर विराटही बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सवेल ही जोडी बंगळुरुला विजयापर्यंत घेऊन गेली. दिनेश कार्तिकने (नाबाद) ७ तर मॅक्सवेलने (नाबाद) ८ धावा केल्या. बंगळुरुने ७ गडी राखून मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय मिळवला

हेही वाचा >>> IPL 2022, SRH vs CSK : चेन्नईचा सलग चौथा पराभव, हैदराबादचा आठ गडी राखून दणदणीत विजय

याआधी आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबईचा संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. मुंबईची सुरुवात चांगली झाली. इशान किशन, रोहित शर्मा यांनी मैदानावर आपली पकड घट्ट केलेली असताना हर्षल पटेलने रोहित शर्माला बाद करत ही जोडी तोडली. रोहित २६ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेला देवाल्ड ब्रेविस अवघ्या आठ धावा करून पायचित झाला. ६० धावांनंतर मात्र मुंबईचा संघ ढासळत गेला.

हेही वाचा >>> Video | चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडवर हैदराबादचा नटराजन पडला भारी, पहिल्याच चेंडूवर उडवला त्रिफळा

६२ धावांवर मुंबईचे इशान किशन, तिलक वर्मा आणि किरॉन पोलार्ड असे तीन दिग्गज फलंदाज एकापाठोपाठ बाद झाले. इशान किशनने २६ धावा केल्या. तर तिलक वर्मा आणि किरॉन पोलर्ड शून्यावर बाद झाले. एकीकडे संघ खिळखिळा झालेला असताना तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या सूर्यकुमारने मात्र धडाकेबाज नाबाद खेळी केली. त्याने ३७ चेंडूंमध्ये तब्बल ६ षटकार आणि ५ चौकार लगावत ६८ धावा केल्या. तर रमणदीप सिंगने सहा तर उनाडकटने (नाबाद) १३ धावा केल्या. वीस षटके संपेपर्यंत मुंबई संघ १५१ धावा करु शकला.

हेही वाचा >>> १५ व्या मजल्याच्या बाल्कनीत लटकत ठेवल्याचा चहलचा अनुभव ऐकताच सेहवागची मोठी मागणी, म्हणाला, “हे खरं असेल तर…”

दुसरीकडे बंगळुरुच्या गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी आपले काम चोख बजावत मुंबईला रोखण्यात यश मिळवले. इशान किशन मैदनावर असताना मुंबईचा संघ २०० पेक्षा जास्त धावा करेल अशी शक्यता व्यक्त केली जात असताना बंगळुरुच्या गोलंदाजांमुळे मुंबई संघ अवघ्या १५१ धावा करु शकला. वनिंदू हसरंगाने किरॉन पोलार्ड आणि देवाल्ड ब्रेविस या फसलंदाजांना बाद केलं. तर हर्षल पटेलने रोहित शर्मासह रमणदीप शर्माला तंबुत पाठवलं. आशा दीपने इशान किशनला बाद करून मुंबईला मोठा झटका दिला. सिराजने चार षटकांत ५१ धावा दिल्या मात्र त्याला बळी मिळवण्यात यश आले नाही.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 rcb vs mi royal challengers bangalore won by 8 wickets defeated mumbai indians prd
First published on: 09-04-2022 at 23:45 IST