आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील १८ वा सामना चांगलाच अटीतटीचा होत आहे. मुंबईचा संघ खिळखिळा झालेला असताना एकट्या सूर्यकुमार यादवने धडाकेबाज फलंदाजी करत संघाला सावरलंय. त्याने चौकार षटकार यांचा पाऊस पाडत ६८ धावा केल्या आहेत. त्याच्या या धमाकेदार फलंदाजीमुळे मुंबईला १५१ धावांपर्यंत पोहोचता आलंय. सामना बघायला आलेले प्रेक्षकदेखील त्याच्या या फलंदाजीने प्रभावित झाले असून मैदानात ‘एकच वादा सूर्या दादा’ असं लिहलेले पोस्टर्स झळकले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Video | चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडवर हैदराबादचा नटराजन पडला भारी, पहिल्याच चेंडूवर उडवला त्रिफळा

मुंबई संघाने पहिल्यांदा फलंदाजीला येत चांगली सुरुवात केली होती. मात्र ५० धावांनंतर मुंबईचे फलंदाज लागोपाठ बाद होत गेले. मुंबई ६२ धावंसंख्येवर असताना इशान किशन, तिलक वर्मा आणि किरॉन पोलार्ड हे तीन फलंदाज एकापाठोपाठ बाद झाले. त्यामुळे मुंबई संघ चांगलाच अडचणीत सापडला होता. मात्र तिसऱ्या विकेटसाठी फलंदाजीसाठी आलेल्या सूर्यकुमार यादवने धडाकेबाज खेळ दाखवला.

मुंबई इंडियन्सच्या चाहत्याने अशा प्रकारे हातात पोस्टर पकडले होते.

हेही वाचा >>> Video : मुंबई-बंगळुरु सामन्यापूर्वी विराटला संताप अनावर, सराव करताना बॅटवर काढला राग, नेमकं काय घडलं ?

मुंबई संघ खिळखिळा झालेला असताना सूर्यकुमारने ३७ चेंडूमध्ये पाच चौकार आणि सहा षटकार लगावत ६८ धावा केल्या. त्याच्या या फलंदाजीमुळे मुंबई संघाला संजीवनी मिळाल्यासारखे झाले. सूर्यकुमारच्या फलंदाजीमुळे मुंबईला १५१ धावा करता आल्या. याच कारणामुळे मैदानावर सूर्यकुमार यादवचा जयजयकार झालेला पाहायला मिळाला. मुंबईच्या चाहत्यांनी तर हातात पोस्टर्स घेऊन सूर्यकुमारच्या या खेळाची प्रशंसा केली. एक चाहता तर एकच वादा सूर्या दादा, असं लिहलेलं एक पोस्टर घेऊन सामना पाहत होता.

हेही वाचा >>>  IPL 2022, SRH vs CSK : चेन्नईचा सलग चौथा पराभव, हैदराबादचा आठ गडी राखून दणदणीत विजय

दरम्यान, सूर्यकुमार यादव वगळता मुंबईचा एकही खेळाडू चांगला खेळ करू शकला नाही. इशान किशनने २६, रोहित शर्माने २६, देवाल्ड ब्रेविसने आठ धावा केल्या. तर तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड शून्यावर बाद झाले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fan hold poster appreciating suryakumar yadav batting in mi vs rcb ipl 2022 match prd
First published on: 09-04-2022 at 22:44 IST