आयपीएल २०२३ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणारा फिरकीपटू युजवेंद्र चहलने संजू सॅमसनला आयपीएलचा आवडता कर्णधार म्हणून निवडले आहे. चहलने म्हटले आहे की संजू सॅमसन त्याच्यासाठी हुबेहुब एमएस धोनीसारखा दिसतो. संजू धोनीप्रमाणेच शांत आणि मस्त राहतो. चहलने म्हटले आहे की, संजूमुळे गेल्या एका वर्षात त्याच्या गोलंदाजीत खूप वाढ झाली आहे आणि याचे सर्व श्रेय संजूला जाते. युजवेंद्र चहल याआधी आयपीएलमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली खेळला आहे.

माझ्या गोलंदाजीतील १०% सुधारणा संजूमुळे झाली – चहल

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत युजवेंद्र चहलने संजू सॅमसनची तुलना एमएस धोनीशी केली आणि म्हणाला, “जर तुम्ही माझ्या आयपीएलमधील आवडत्या कर्णधाराला विचाराल तर तो नक्कीच संजू सॅमसन आहे कारण तो माझ्यासाठी माही भाईसारखा दिसतो, खूप शांत आणि मस्त आहे. गेल्या एका वर्षात माझ्या गोलंदाजीत १०% सुधारणा झाली ती फक्त संजू सॅमसनमुळे. संजू मला माही भाईप्रमाणे स्वातंत्र्य देतो. तो म्हणतो की तुम्ही ४ षटके अगदी मोकळेपणाने टाकता.”

माही भाईने माझे आणि कुलदीपचे करिअर बनवले – चहल

या मुलाखतीदरम्यान चहलने एमएस धोनीचेही कौतुक केले आहे. माझ्या आणि कुलदीपच्या करिअरला चालना देण्यासाठी माही भाईने आम्हाला खूप मदत केल्याचे चहलने म्हटले आहे. चहल म्हणाला की, “त्याची ५० टक्के मदत आम्हा दोघांच्या कारकीर्दीला पुढे नेण्यात आहे, कारण मैदानावर तो आम्हाला कुठे गोलंदाजी करायची आणि कोणता चेंडू टाकायचा हे सांगायचा.”

हेही वाचा: LSG vs GT पांड्या बंधुंचा स्वॅगच न्यारा! आधी स्लेजिंग अन् नंतर एकमेकांची जर्सी… पाहा Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चहल पुढे म्हणाला की, “आत्तापर्यंत मी भारतासाठी तीन कर्णधारांच्या हाताखाली खेळलो आहे ज्यात माही भाई, विराट भैया आणि रोहित भैया यांचा समावेश आहे. या तिन्ही कर्णधारांनी मला स्वातंत्र्य दिले आहे. माही भाई करिअर आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित सर्व प्रकारच्या सल्ल्यांसाठी नेहमीच तयार असतो. त्याच्या आवडत्या कर्णधाराबद्दल विचारले असता चहल म्हणाला, “मला वाटते की मी ज्या तिन्ही कर्णधारांच्या हाताखाली खेळलो आहे त्यांनी मला गोलंदाज म्हणून स्वातंत्र्य दिले आहे जे एका गोलंदाजाला हवे असते. माही भाई, विराट भैया किंवा रोहित भाई असो, मला एक गोष्ट मिळाली आहे ते म्हणजे स्वातंत्र्य मला मिळाले आहे. परंतु तरीदेखील माहीभाई सारखा असणारा संजू सॅमसन सध्या माझा आवडता कर्णधार आहे.”