एम.एस. धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज सध्या १३ गुणांसह आयपीएल २०२३ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. आज हा संघ चेपॉक येथे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध या मोसमातील १२वा आणि ५५वा सामना खेळणार आहे. संघाने मागील चारपैकी दोन सामने गमावले आहेत, तर लखनऊविरुद्धचा सामना पावसाने वाहून गेला होता. चेन्नईने मुंबईविरुद्धचा शेवटचा सामना जिंकला होता. क्रिकेट पंडितांच्या मते, या संघासाठी प्लेऑफमध्ये पात्र ठरण्याचे आव्हान उर्वरित संघांपेक्षा जास्त कठीण नाही. धोनीची ही शेवटची आयपीएल असू शकते, असेही काही लोकांचे म्हणणे आहे. मात्र, याबाबत धोनीने स्वत: कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

गेल्या मोसमात चेन्नई वादांच्या छायेत होते

गेल्या मोसमात, चेन्नई संघाने खूप संघर्ष केला होता आणि नवव्या स्थानावर त्यांनी फिनिश केले. कर्णधारपदाच्या वादापासून ते जडेजाची संघातून हकालपट्टीपर्यंत चेन्नई वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. वास्तविक, २०२२च्या हंगामापूर्वी जडेजाला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने सलग अनेक सामने गमावले होते. अशा स्थितीत जडेजाला चालू आयपीएलमध्ये कर्णधारपदावरून वगळण्यात आले आणि धोनी पुन्हा कर्णधार झाला. त्यानंतर चेन्नई संघाची कामगिरी सुधारू लागली होती. भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि समालोचक रवी शास्त्री यांनी सीएसकेच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या शक्यता आणि चार वेळच्या चॅम्पियन्स संघाच्या विजयामागील ‘धोनी फॅक्टर’चे विश्लेषण केले.

हेही वाचा: The Elephant Whisperers: माहीची ग्रेट-भेट! धोनीने ऑस्कर विजेत्या डॉक्युमेंट्री ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ टीमला CSKची जर्सी दिली गिफ्ट

असे शास्त्री यांनी धोनीचे कौतुक करताना म्हटले आहे

शास्त्री म्हणाले, “धोनी टीम कॉम्बिनेशन बनवण्यात माहिर आहे. हे इन्ट्यूशन आणि त्यांना समज यामुळेच तो चतुर कर्णधार आहे. २०२२मध्ये चांगली कामगिरी न करणाऱ्या खेळाडूला शक्यतो सातत्यपूर्ण संधी न दिल्याने तिथे संघाचे चक्र बिघडले होते. मात्र, धोनीला २०२३मध्ये चांगली कामगिरी करण्याचा विश्वास होता, त्याची दूरदृष्टी ही अफाट आहे. जर एखादा खेळाडू मागील हंगामात चांगले प्रदर्शन करू शकला नसेल तर त्या खेळाडूला पुन्हा पुढील हंगामात संघात घेऊन पाठिंबा देतो जेणेकरून त्याचा आत्मविश्वास तो वाढवतो. धोनी नेहमी पुढचा विचार करतो. त्याने काही खेळाडूंसोबत असे केले आहे, मला याचे आश्चर्य वाटणार नाही. मी सध्या संघासोबत नाही आणि मला जास्त माहिती नाही, पण तो नक्कीच तसा विचार करतो.”

चेन्नईत दोन प्लेऑफ सामने होणार आहेत

रवी शास्त्री म्हणाले, “जेव्हा तुम्ही पॉइंट टेबल पाहता, तेव्हा CSK चा संघ प्लेऑफमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित दिसते. जेव्हा हा संघ प्लेऑफमध्ये खेळतो तेव्हा ते अधिक धोकादायक बनतो. प्लेऑफमध्ये चेन्नईमध्ये दोन सामने (प्रथम क्वालिफायर आणि एलिमिनेटर) होतील. अशा परिस्थितीत सीएसके हा संघ खूप पुढे जाऊ शकतो कारण संघ आधीच सेटल झाला आहे. प्लेइंग-११ मध्ये जर काही गडबड झाली असेल तर ती दुखापतीमुळे असेल. अन्यथा संघ व्यवस्थापनाने त्याचे परिपूर्ण प्लेइंग-११ निवडले आहे.”

हेही वाचा: Virat Kohli: “माझ्यावर विश्वास ठेव…”, विराट-अनुष्काच्या पहिल्या स्कूटी राइडचा किस्सा तुम्हाला महिती आहे का?

निवृत्तीबाबत रैनाचे विधान

एकीकडे सर्व संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी लढा देत असताना दुसरीकडे सुरेश रैनाने अलीकडेच धोनीशी निवृत्तीबाबत बोलल्याचे सांगितले होते. रैनाने सांगितले की, “धोनीने मला सांगितले की मी ट्रॉफी जिंकल्यानंतर आणखी एक वर्ष खेळेन.” म्हणजेच धोनी या हंगामानंतर आयपीएलमधून निवृत्त होणार नाही. चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मात्र, याआधीही त्यांनी याबाबत उत्तर दिले आहे. अलीकडेच चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्यात समालोचक डॅनी मॉरिसनने धोनीला विचारले की, “हा त्याचा शेवटचा हंगाम आहे का?” मात्र, धोनीने यावर मजेशीर उत्तर दिले. तो हसला आणि म्हणाला, “तुम्ही ठरवले आहे की हे माझे शेवटचे आयपीएल आहे, मी नाही.”