scorecardresearch

IPL 2023: “आयपीएलपेक्षा भारताला अधिक…”, सुनील गावसकरांचा टीम इंडियाला सल्ला; ‘या’ चुकांवरही ठेवलं बोट!

भारताला त्यांच्या भूमीवर कोणत्याही फॉरमॅटमध्ये पराभूत करणे खूप कठीण काम आहे आणि ऑस्ट्रेलियाने ते केले आहे. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने भारताविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकली.

IPL will start and such defeat will be forgotten Sunil Gavaskar's stern warning to Rohit Sharma and Rahul Dravid
संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२३ सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचे सर्व आंतरराष्ट्रीय सामने संपले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा १-२ असा पराभव झाला. यंदा आयसीसी विश्वचषकाचे भारताला यजमानपद मिळाले असून अशा परिस्थितीत घरच्या मैदानावर मालिका गमावणे हे टीम इंडियासाठी लाजिरवाणी बाब आहे. ही मालिका संपताच सर्वांचे लक्ष आयपीएलकडे वळेल, अशा स्थितीत टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला कडक इशारा दिला आहे.

गावसकर म्हणाले की, “ऑस्ट्रेलियाच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे भारतीय फलंदाजांवर खूप दडपण आले आणि त्यांनी खराब शॉट्स खेळून विकेट्स गमावल्या. स्टार स्पोर्ट्सवर गावसकर म्हणाले, “या दबावामुळे भारताला एकेरी-दुहेरी धावाही मिळत नव्हत्या. जेव्हा असे होते, तेव्हा तुम्ही असे शॉट्स खेळता ज्याची तुम्हाला सवय नसते. ही अशी समस्या आहे की त्याची दखल घ्यायला हवी, पण हो आता आयपीएल सुरू होणार आहे, हे विसरता कामा नये. भारत काही वेळा गोष्टी विसरण्याची चूक करतो. पण असे होऊ नये कारण हे विश्वचषक स्पर्धेचे वर्ष आहे आणि आम्हाला पुन्हा ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागू शकतो.”

हेही वाचा: IND vs AUS: कांगारूंनी रोखला टीम इंडियाचा विजयरथ! मायदेशातील पराभवावर दिग्गजांनी डागली तोफ, स्मिथचे केले कौतुक

संघाने आधी देशाला प्राधान्य द्यावे- गावसकर

सुनील गावसकर म्हणाले, “ आता आयपीएल सुरु होणार ही चांगली गोष्ट आहे पण भारतीय संघातील खेळाडूंनी आधी देशाला प्राधान्य दिले पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही देशासाठी खेळतात त्यावेळेस कुठलेही वैयक्तिक कारण इथे चालत नसते. कारण अशावेळी तुमची संघाला गरज असते. रोहित शर्माने पहिला एकदिवसीय सामना न खेळणे हे मला अजिबात आवडले नाही. आयपीएल असताना अशी कारणे तुम्ही देऊ शकत नाहीत, तिथे तुम्हाला लगेच मालक बोलतील याची भीती असते. तसेच देशासाठी खेळताना देखील तुम्ही असे गैरहजर असणे आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने थोडे बरोबर नाही असे मला वाटते. दुखापत, आजारी असला तर ती गोष्ट वेगळी आहे. अशावेळी तुम्ही सुट्टी घेतली तर काही हरकत नाही.” असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा: IPL 2023 Rule Change: आता एक नाही दोन प्लेईंग-११! टॉस झाल्यावरही डावपेच बदलू शकणार कर्णधार, कसे असतील IPLचे मजेशीर नियम?

लिटिल मास्टर गावसकर पुढे म्हणाले की, “सलामीची जोडी आणि विराट कोहली-केएल राहुल यांच्याशिवाय कोणीही मोठी भागीदारी करू शकले नाही. रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी ९.१ षटकात ६५ धावा जोडल्या, तर विराट आणि केएल राहुल यांनी ६९ धावांची भागीदारी केली.” गावसकर म्हणाले, “जेव्हा तुम्ही २७० धावांचा पाठलाग करत असाल तेव्हा तुम्हाला ९०-१०० धावांची भागीदारी हवी आहे. पण असे झाले नाही. ऑस्ट्रेलियाचे क्षेत्ररक्षण उत्कृष्ट होते आणि त्यांची गोलंदाजीही शानदार होती. पण त्याच्या क्षेत्ररक्षणामुळे खूप मोठा फरक पडला.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 14:15 IST

संबंधित बातम्या