scorecardresearch

IPL 2023, SRH vs RR: फारुकीची भेदक गोलंदाजी तरीही राजस्थान दोनशेपार; हैदराबादसमोर विजयासाठी २०४ धावांचे आव्हान

IPL 2023 Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Score: इंडियन प्रीमिअर लीगच्या चौथ्या सामन्यात बटलर, यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार संजू सॅमसन यांनी अर्धशतक झळकावत हैदराबादसमोर २०४ धावांचे आव्हान ठेवले आहे.

IPL 2023, SRH vs RR: Faruqi's incisive bowling still Rajasthan two-point A challenge of 204 runs for victory against Hyderabad
सौजन्य- IPL २०२३ (ट्विटर)

IPL 2023, SRH vs RR Cricket Score Update: इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा हंगाम गाजवणारा राजस्थान रॉयल्स संघाचा विस्फोटक फलंदाज जॉस बटलर आयपीएल २०२३ स्पर्धेतही धमाल करतोय. रविवारी (दि. २ एप्रिल) सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात बटलरने वादळी फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. या अर्धशतकानंतर त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवले गेले. एका विक्रमात त्याने केएल राहुल आणि सुनील नारायण या खेळाडूंनाही मागे टाकले. साथीला जैस्वाल आणि कर्णधार संजू सॅमसन यांनीही अर्धशतक झळकावत हैदराबादसमोर २०४ धावांचे आव्हान ठेवले आहे.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात रंगलेल्या या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात २०३ धावा केल्या. यावेळी कर्णधार भुवनेश्वर कुमार याने गोलंदाजीचा निर्णय घेत राजस्थान रॉल्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. राजस्थानकडून डावाची सुरुवात करण्यासाठी जॉस बटलर आणि यशस्वी जैस्वाल मैदानात उतरले होते. यावेळी दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ८५ धावांची झंझावाती भागीदारी केली. यामध्ये बटलरच्या अर्धशतकाचा समावेश होता.

बटलरने यादरम्यान अवघ्या २० चेंडूत अर्धशतक झळकावले. पुढे तो आणखी दोन चेंडू खेळून ५.५ षटकात फजलहक फारुकीच्या चेंडूवर बाद झाला. यावेळी बटलरने सामन्यात २२ चेंडूत तीन षटकार आणि सात चौकारांचा साज चढवत ५४ धावा केल्या. या धावा त्याने २४५.४५च्या स्ट्राईक रेटने चोपल्या. या अर्धशतकामुळे त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला आहे. शेवटी, शिमरॉन हेटमायरनेही २२ धावा कुटत संघाला दोनशेचा टप्पा पार करून दिला. त्याच्या या खेळीत एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. सनरायझर्स हैदराबादकडून फजलहक फारुकी आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. उमरान मलिकने त्यांना एक विकेट घेत साथ दिली. राजस्थानने ठेवलेल्या या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणे हैदराबादसाठी सोपे नसेल.

हेही वाचा: MS Dhoni WC 2011: ‘जेव्हा भूतकाळातील आनंददायी…’ धोनीच्या ऐतिहासिक विजयी षटकाराची पुनरावृत्ती! CSKने केला video शेअर

दोन्ही संघांची प्लेईंग-११

राजस्थान रॉयल्सचा संघ-जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडीकल, शेमरॉन हेटमायर, संजू सॅमसन, रियान पराग, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, केएम आसिफ, ट्रेन्ट बोल्ट.

सनरायजर्स हैदराबादचा संघ मयंक अग्रवाल, अभिषेक, राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, आदिल राशिद, उमरान मलिक, फारूकी आणि नटराजन.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 17:26 IST

संबंधित बातम्या