Ambati Rayudu Statement on CSK Fans and MS Dhoni: एम एस धोनीचा चाहता वर्ग किती मोठा आहे, हे आपल्या सर्वांना कायमचं दिसत असते. आयपीएलमधून चेन्नईकडून खेळताना धोनीसाठी चाहते खूप चिअर करताना दिसतात. याचदरम्यान CSK आणि भारताचा माजी खेळाडू अंबाती रायुडूने म्हटले की सीएसकेचे अनेक चाहते हे प्रथम एमएस धोनीचे चाहते आहेत आणि नंतर फ्रेंचायझीचे चाहते आहेत. इंडियन प्रीमियर लीग २०२४ सीझनच्या CSK च्या अखेरच्या सामन्यापूर्वी स्टार स्पोर्ट्सवर बोलताना रायुडूने म्हटले की जेव्हा तो चेन्नईकडून आयपीएलमध्ये खेळत असे तेव्हा चाहते प्रथम एमएस धोनीला खेळताना पाहण्यासाठी येत असतं आणि नंतर चेन्नईच्या संघाचा सामना पाहण्यासाठी. पाहूया रायुडू नेमकं काय म्हणाला.

रायुडूने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना धोनी आणि संघाबाबत काही माहितीही दिली. धोनीला पाहण्यासाठी येणारे चाहते क्वचितच इतर खेळाडूंना पाठिंबा द्यायचे हे पाहून तो आणि जडेजा चांगले अस्वस्थ व्हायचे असेही त्याने सांगितले. सामन्यांमध्ये त्याला आणि रवींद्र जडेजाला चौकार मारल्यास किंवा चांगली कामगिरी केल्यावर चाहते चिअर करत नाहीत, परंतु चेन्नईमध्ये एमएस धोनीला चाहते कायमच पाठिंबा देतात. रायुडूने सांगितले की, रवींद्र जडेजा गेल्या काही वर्षांपासून निराश झाला आहे, परंतु त्याबाबत काहीही करता येणार नाही, हे त्याला माहित आहे.

हेही वाचा- IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?

“आम्ही जर एखादा चौकार किंवा षटकार मारला तरी चाहते शांत असतात. मला आणि जडेजाला गेल्या काही वर्षांत याचा अनुभव आला आहे. मी अगदी खात्रीपूर्वक सांगतो की, सीएसकेचे चाहते हे आधी एमएस धोनीचे चाहते आहेत आणि त्यानंतर ते सीएसकेचे चाहते आहेत. जडेजाही याबाबतीत खट्टू होतो की चाहते धोनीच्या तुलनेत इतर खेळाडूंना फार कमी चिअर करतात, पण याबाबत तो काहीही करू शकत नाही,”रायुडू स्टार स्पोर्ट्सवर म्हणाला.

हेही वाचा- IPL 2024: GT vs KKR सामना रद्द झाल्याने कुणाचं प्लेऑफचं स्वप्न पाण्यात? कुणाला झाला फायदा?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीला चाहत्यांकडून अनपेक्षित असा पाठिंबा मिळत आहे. कदाचित यंदाचा आयपीएल हंगाम हा धोनीचा अखेरचा आयपीएल हंगाम असू शकतो, अशी चर्चा आहे. दुखापतींनी त्रस्त असलेला तरीही धोनी या हंगामात तुफान फटकेबाजी करताना दिसला आहे. अखेरच्या षटकातील फिनिशर धोनीची फटकेबाजी प्रतिस्पर्धी संघासाठी फारच धक्कादायक ठरते.