IPL 2024, Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore: चेन्नई सुपर किंग्जचा नवा वेगवान गोलंदाज मुस्ताफिझूर रहमानने इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या पहिल्या सामन्यात धुव्वा उडवला. ४ दिवसांपूर्वी स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर गेलेला मुस्ताफिझूर पहिल्याच सामन्यात धोनीच्या संघासाठी हिरो ठरला. CSK कडून मुस्ताफिझूरने आपल्या चार षटकांमध्ये फक्त ३० धावा देत ४ मोठ्या विकेट घेतल्या. मुस्तफिझूर त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये इतका प्रभावी ठरला की विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस धावा काढण्यासाठी आठोकाठ प्रयत्न करताना दिसले. पहिल्या स्पेलमध्ये मुस्तफिझूरने दोन षटकांत ७ धावा देऊन ४ बळी घेतले होते.

मुस्तफिझूरला दुसऱ्या स्पेलमध्ये विकेट मिळाली नाही, पण त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यामुळे आरसीबीचे खेळाडू शॉट मारताना विचार करत होते. मुस्ताफिझूरने आपल्या गोलंदाजीने फाफ डुप्लेसिस, विराट कोहली, कॅमेरून ग्रीन आणि रजत पाटीदार यांच्या विकेट घेतल्या. मुस्ताफिझूरने आरसीबीच्या मजबूत फलंदाजी फळीला आपल्या गोलंदाजीवर नाचवले.

मुस्ताफिझूर रहमान हा बांगलादेशचा वेगवान गोलंदाज नुकताच श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. खरेतर मैदानावर गोलंदाजी करताना त्याला संपूर्ण शरीरात क्रॅम्प आले होते. मुस्ताफिझूरला मैदानाबाहेर जाण्यासाठी पायी चालत जाणेही शक्य नव्हते,अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. पण चांगली गोष्ट म्हणजे मुस्ताफिझूर खेळण्यासाठी फिट झाला आणि तो आयपीएलमध्ये सीएसकेसाठी पूर्णपणे तंदुरुस्त होऊन परतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुस्ताफिझूर रहमानच्या घातक गोलंदाजीतून सावरल्यानंतर, दिनेश कार्तिक आणि अनुज रावत यांच्या दमदार फलंदाजीमुळे आरसीबी संघाला २० षटकांत ६ बाद १७३ धावा करण्यात यश आले. आरसीबीसाठी अनुजने अवघ्या २५ चेंडूत ४८ धावा केल्या. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ३ षटकारही मारले. याशिवाय दिनेश कार्तिकने २६ चेंडूत ३८ धावांची दमदार खेळी केली. कार्तिकने आपल्या खेळीत ३ चौकार आणि २ षटकार मारले.