IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा १७वा हंगाम येत्या २२ मार्चपासून सुरू होत आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या मोठ्या संघांमध्ये पहिली लढत पाहायला मिळणार आहे. यंदाच्या आयपीएलमधील सुरूवातीच्या सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयने शेअर केले आहे. म्हणजेच २२ मार्च ते ७ एप्रिल या तारखांना कोणकोणते सामने होतील, हे निश्चित आहे. पण उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक हे लोकसभा निवडणुकांच्या तारखा पाहून निश्चित केले जाणार आहे. यासोबतच यंदाच्या मोसमात कोणकोणते नवीन बदल आपल्याला पाहायला मिळणार आहेत, हे आपण जाणून घेऊया.

– quiz

MS Dhoni Review System as Umpire Gives Wide Ball in CSK vs LSG match IPL 2024
IPL 2024: धोनी रिव्ह्यू सिस्टीम! पंचांचा निर्णय अन् लगेचच माहीचा रिव्ह्यूसाठी इशारा, पाहा काय घडलं?
Dale Steyn Tweet on Hardik Pandya after MI vs RR match
IPL 2024: “मॅच हरणार, मग हसत पुन्हा तीच वायफळ बडबड करत वक्तव्य देणार” डेल स्टेनने नाव न घेता पंड्याला सुनावलं? पोस्ट होतेय व्हायरल
rishbh pant
Ipl 2024, LSG vs DC: दिल्लीला कामगिरीत सुधारणेची आशा! आज लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान; राहुल, पंतकडे लक्ष
rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान

किती सामने खेळवले जाणार?

गतवर्षीप्रमाणे यंदाही ७० साखळी सामने होणार असून प्रत्येक संघ १४ सामने खेळणार आहे. टॉप चार संघ प्लेऑफसाठी पात्र होतील. ज्यामध्ये क्वालिफायर १, एलिमिनेटर त्यानंतर क्वालिफायर २ आणि अंतिम फेरी खेळवली जाईल. ओपनिंग सेरेमनीमुळे पहिला सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. तर इतर दिवशी सामने हे संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होतील. डबल-हेडरच्या दिवशी, सामने अनुक्रमे दुपारी ३.३० आणि संध्याकाळी ७.३० या वेळेत खेळवले जाणार आहेत.

संघांचे नवे कर्णधार

आयपीएल संघांमधील कर्णधारपदाचा सर्वात मोठा बदल म्हणजे गुजरात टायटन्सचा हार्दिक पांड्या हा मुंबई इंडियन्समध्ये परतला. त्याचे फक्त संघात पुनरागमन झाले नाही तर आय़पीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माच्या जागी मुंबई संघाने हार्दिकला कर्णधार म्हणून घोषित केले. त्यामुळे आता गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्त्व युवा फलंदाज शुबमन गिलच्या खांद्यावर असणार आहे. डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या भीषण कार अपघातानंतर ऋषभ पंत आयपीएलमधून मैदानात पुन्हा उतरणार आहे. त्याला एनसीएकडून फिट घोषित केल्याने तो दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्त्व करतानाही दिसणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघानेही आपला कर्णधार यंदाच्या मोसमात बदलला आहे. एडन मारक्रमच्या जागी ऑस्ट्रेलियाचा अनुभवी कर्णधार पॅट कमिन्सला संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे गतवर्षीच्या आयपीएलमध्ये खेळला नव्हता. यंदाच्या मोसमात एनसीएने त्याला आयपीएलसाठी फिट घोषित करत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे नितीश राणाच्या जागी यंदा तो संघाचे नेतृत्त्व करताना दिसेल.

या वर्षी कर्णधारपदातील सर्वात मोठा बदल म्हणजे हार्दिक पांड्या गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्समध्ये परतणे हा पाचवेळा आयपीएल विजेता कर्णधार रोहित शर्माच्या जागी प्रमुखपदी आहे. हार्दिक गेल्याने शुभमन गिल टायटन्सचे नेतृत्व करेल. डिसेंबर 2002 मध्ये झालेल्या कार अपघातानंतर प्रथमच स्पर्धात्मक क्रिकेट पुन्हा सुरू करणारा ऋषभ पंत गेल्या मोसमात नेतृत्व करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरकडून कॅपिटल्सचे कर्णधारपद परत घेईल. एसएस धोनी यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई संघाचे नेतृत्त्व करताना दिसेल.

संघ आणि त्यांचे घरचे मैदान

चेन्नई सुपर किंग्ज – एम ए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू
कोलकाता नाईट रायडर्स – एडन गार्डन्स, कोलकाता
मुंबई इंडियन्स – वानखेडे स्टेडियम, मुंबई
गुजरात टायटन्स – नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
सनरायजर्झ हैदराबाद – राजीव गांधी स्टेडियम, उप्पल,हैदराबाद
लखनऊ सुपर जायंट्स – एकाना स्टेडियम, लखनऊ

इतर संघांचे घरचे मैदान म्हणून असलेले स्टेडियम सारखेच आहेत. पण पंजाब किंग्ज यंदा नव्या स्टेडियममध्ये आपले सामने खेळणार आहेत. पंजाबचा संघ काही सामने मुल्लानपूरमध्ये खेळतील.तर धर्मशालाच्या नयनरम्य स्टेडियमवर दोन सामने खेळतील. दरम्यान दिल्ली कॅपिटल्स विशाखापट्टणममध्ये घरच्या मैदानावर म्हणून त्यांचे पहिले दोन सामने खेळतील आणि उर्वरित हंगामात दिल्लीच्या स्टेडियममध्ये खेळवले जातील.

आयपीएल २०२४ मधील नवे नियम

या मोसमात गोलंदाजांना एका षटकात दोन बाऊन्सर टाकण्याची परवानगी असेल, जेणेकरून बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये समान स्पर्धा निर्माण होईल. गेल्या वर्षी लागू झालेला इम्पॅक्ट प्लेयर नियम कायम असेल. याव्यतिरिक्त, IPL या हंगामात जलद आणि अधिक अचूक रिव्ह्यूसाठी स्मार्ट रिप्ले सिस्टीम आणण्याच्या तयारीत आहे.

लिलावातील विक्रमी बोली

आयपीएलसाठी डिसेंबर २०२३ मध्ये लिलाव झाला. या लिलावात काही विक्रमी बोली लागल्या होत्या. सनरायझर्सने कमिन्सला संघात घेण्यासाठी २०.५ कोटी मोजले. कमिन्स हा आयपीएल लिलावात आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. पण हा विक्रम काही काळापुरताच राहिला, कारण केकेआरने काही मिनिटांनंतर मिचेल स्टार्कला २४.७५ कोटी मोजत संघाच सामील करून घेतले. डॅरिल मिशेल १४ कोटींमध्ये चेन्नईच्या ताफ्यात दाखल झाला. तर चेन्नईनेच रचिन रवींद्र (१.८ कोटी) आणि समीर रिझवी (८.४ कोटी) यांनीही संघाचा भाग केले. पंजाबने हर्षल पटेलला ११.७५ कोटींमध्ये खरेदी केले, तर आरसीबीने अल्झारी जोसेफसाठी ११.५ कोटी मोजले.

हे चेहरे यंदाच्या आयपीएलमध्ये नसणार…

इंग्लिश संघाचे अनेक खेळाडू यंदाच्या मोसमात नसतील, बेन स्टोक्स, जो रूट, जोफ्रा आर्चर यंदा दिसणार नाहीत. इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉयने हंगामापूर्वी आयपीएलमधून माघार घेतली आणि हॅरी ब्रूकनेही वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली. मार्क वुडनेही एलएसजीसोबतच्या करारातून माघार घेतली. घोट्याच्या दुखापतीमुळे शस्त्रक्रिया झाल्याने मोहम्मद शमीही दिसणार नाही. स्टीव्हन स्मिथ आणि जोश हेझलवूड यांच्यावर लिलावात कोणत्याच संघाने बोली लावली नाही.

आयपीएल २०२३ चा अंतिम सामना

आयपीएल २०२३च्या रोमांचक अंतिम फेरीत चेन्नई संघाने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला होता. पावसामुळे तिस-या दिवशी झालेल्या दमदार फायनलमध्ये टायटन्सचा पराभव करत चेन्नईने त्यांच्या पाचव्या आयपीएल ट्रॉफीवर कब्जा केला. सीएसकेला शेवटच्या दोन चेंडूंवर विजयासाठी १० धावांची गरज असताना, रवींद्र जडेजाने एक षटकार आणि चौकार मारून अहमदाबादला नमवले आणि ट्रॉफीवर नाव कोरले.