How Can Chennai Super Kings Qualify for Playoffs: पंजाब किंग्जने चेपॉकचा किल्ला भेदत चेन्नई सुपर किंग्ज संघाचा ७ विकेट्सने पराभव केला आहे. या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात सीएसके संघाने प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जला १६३ धावांचे लक्ष्य दिले, ज्याचा पंजाब किंग्जने सहज पाठलाग केला. आता या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्जचा प्लेऑफमध्ये जाण्यासाठीचा मार्ग चांगलाच खडतर झाला आहे.

आयपीएल २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने आतापर्यंत १० पैकी पाच सामने जिंकले आहेत. संघाला पाच सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. संघाचे १० गुण असून ते चौथ्या स्थानावर आहे. चेन्नईचे अजून चार सामने बाकी आहेत, जे त्यांना पंजाब किंग्ज, आरसीबी, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स विरुद्ध खेळायचे आहेत.

चेन्नई सुपर किंग्ज संघाला प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी उर्वरित चारपैकी तीन सामने जिंकणे आवश्यक आहे. जेणेकरून ते सहज प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करू शकतील. हैदराबादविरूद्धचा ७८ धावांनी मिळवलेला विजय संघासाठी महत्त्वाचा ठरला आहे. सध्या सीएसकेचा नेट रन रेट ०.६२७ आहे.

हेही वाचा- T20 World Cup मधील टीम इंडियाचे सामने भारतीय वेळेनुसार किती वाजता खेळवले जाणार? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेन्नई सुपर किंग्जकडून ऋतुराज गायकवाडने अप्रतिम खेळी खेळली. त्याच्या फलंदाजीमुळेच चेन्नईचा संघ सन्मानजनक धावसंख्या गाठू शकला. त्याने ४८ चेंडूत ६२ धावा केल्या. फलंदाजीसाठी कठीण परिस्थितीत गायकवाड एका बाजूला पाय रोवून घट्ट् उभा होता. ४८ चेंडूंच्या खेळीत ५ चौकार आणि २ षटकार खेचून ऋतुराजने सलग दुसरे अर्धशतक झळकावले. यासह तो या मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला. त्याच्या नावावर १० सामन्यात ५०९ धावा आहेत.