IPL 2024, Chennai Super Kings vs Gujarat Titans: पहिल्याच आयपीएल सामन्यात राशीद खानच्या गोलंदाजीवर षटकार खेचणाऱ्या समीर रिझवीच्या कुटंबाचा एक व्हीडिओ समोर आला आहे. समीर आयपीएलमध्ये खेळण्यासाठी जाताना सांगून गेला होता कीच, आयपीएलमधील पहिल्या चेंडूवर मी षटकार लगावणार. रिझवीने अगदी म्हटल्याप्रमाणेच केलं आणि त्याच्या घरच्यांनी शेअर केलेल्या त्याच्या या व्हीडिओमध्ये याचा उल्लेखही आहे. एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जकडून कारकिर्दीतील पहिला चेंडू खेळताना समीर रिझवीने अवघ्या सहा चेंडूंमध्ये १४ धावांची झटपट खेळी केली. या सहा चेंडूंमध्ये त्याने दोन चेंडूवर षटकार मारत सर्वांनाच प्रभावित केले.

समीर रिझवी जगासमोर शानदार पदार्पण करत असताना, उत्तर प्रदेशातून त्याचे कुटुंब टीव्हीवर हा क्षण आनंदाने जगत होते. समीरच्या प्रत्येक षटकारावर टाळ्यांचा कडकडाट होत होता. मागून घरातील सर्वांची कॉमेंट्रीही चालू होती. दरम्यान त्याचा भाऊ सबूल रिझवीने व्हीडिओ पोस्ट केला आहे, ज्यात चेन्नई सुपर किंग्जचा समीर रिझवी त्याच्या आयपीएल कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावणार हे ठरवूनच गेला होता. टीव्हीवर सामना पाहणाऱ्या सबूलने रिझवीच्या शानदार फलंदाजीचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

समीरच्या भावाने शेअर केलेल्या व्हीडिओवर कॅप्शन दिले आहे, “पहिल्याच चेंडूवर षटकार मारणार सांगून गेला होता.” सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये कोणीतरी हेही म्हणालं की, पहिल्याच चेंडूवर षटकार मारणार असे तो जाण्यापूर्वी सांगून गेला होता. काही वेळातच समीरने पुढच्या चेंडूवर षटकार खेचला आणि पुन्हा एकदा त्याच्या घरच्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेन्नई सुपर किंग्जने या यूपीच्या फलंदाजाला ८.४ कोटी खर्चून संघात घेतले. तेव्हापासून तो चर्चेत आहे.चेन्नईने त्याला इतके पैसे खर्चून संघात का घातले, हे जाणून घेण्यासाठी सर्वच त्याची फलंदाजी पाहण्यासाठी उत्सुक होते. जेव्हा शिवम दुबे बाद झाला तेव्हा प्रेक्षक एमएस धोनीला पाहण्याची अपेक्षा करत होते, पण रिझवी मैदानात आला. मात्र, या युवा फलंदाजाने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर उत्कृष्ट गोलंदाज राशिद खानला षटकार खेचताच प्रेक्षकांचा उत्साह द्विगुणित केला.