गुजरात टायटन्सने आयपीएलच्या २५व्या झालेल्या राजस्थानचा ३ विकेट्सने पराभव करत त्यांचा विजयरथ रोखला. गुजरातचा कर्णधार शुबमन गिलने या सामन्यात ४४ चेंडूत ७२ धावांची शानदार खेळी केली. या खेळीसह शुबमन गिलने विराट कोहली आणि संजू सॅमसनचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. शुबमन गिल हा आयपीएलमध्ये ३००० धावांचा टप्पा गाठणारा सर्वात तरूण खेळाडू ठरला आहे.

– quiz

शुभमनने वयाच्या २४ वर्षे २१५ दिवस वय असताना ही कामगिरी केली आहे. या बाबतीत त्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे. विराटने वयाच्या २६ वर्षे १८६ दिवस एवढे वय असताना हा आकडा पार केला होता.

शुबमन गिल – २४ वर्षे २१५ दिवस
विराट कोहली – २६ वर्षे १८६ दिवस
संजू सॅमसन – २६ वर्षे ३२० दिवस
सुरेश रैना – २६ वर्षे १६१ दिवस
रोहित शर्मा – २७ वर्षे ३४३ दिवस

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात ३ हजार धावा पूर्ण करत शुबमन गिलने आयपीएलमधील डेव्हिड वॉर्नर आणि फाफ डु प्लेसिस या दिग्गज खेळाडूंची बरोबरी केली आहे. गिलने आयपीएल कारकिर्दीतील ९४ व्या डावात ३ हजार धावांचा आकडा गाठला आहे. गिलच्या आधी वॉर्नर आणि डुप्लेसिस यांनीही त्यांच्या ९४व्या डावात तीन हजार धावा केल्या होत्या.

गिलने या हंगामात टायटन्ससाठी दोन महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या आहेत आणि ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे. त्याने ५१ च्या सरासरीने आणि १५१.७९ च्या स्ट्राइक रेटने २५५ धावा केल्या आहेत. विराट कोहली आणि रियान परागनंतर तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाणेफेक गमावल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. फलंदाजीची सुरुवात खराब झाली, पण दोन विकेट्स घेतल्यानंतर रियान पराग आणि संजू सॅमसन यांनी मिळून संघाचा डाव सावरला. रियान आणि संजूच्या स्फोटक अर्धशतकांच्या जोरावर राजस्थान संघाने निर्धारित २० षटकांत १९६ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातची सुरुवातही काही खास झाली नाही, मात्र कर्णधार शुबमननंतर राशीद खान आणि राहुल तेवतियाच्या अर्धशतकी खेळीने अखेरच्या षटकात संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला.