IPL 2025 Delhi Capitals vs Gujarat Titans Highlights: आयपीएल २०२५ स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सवर १० गडी राखून विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्सने २० षटकांअखेर १९९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शन आणि शुबमन गिलने मिळून संघाला विजय मिळवून दिला. यासह गुजरातचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे.

Live Updates

IPL 2025 DC vs GT Live Score Updates: आयपीएल २०२५ गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

23:00 (IST) 18 May 2025

DC vs GT Live: साई सुदर्शनचं शतक पूर्ण

या सामन्यात साई सुदर्शनने शानदार शतकी खेळी केली. त्याने ५६ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं.

22:39 (IST) 18 May 2025

DC vs GT Live: गिल- सुदर्शनचं अर्धशतक! गुजरात मजबूत स्थितीत

साई सुदर्शनने आपलं अर्धशतक पूर्ण केल्यानंतर शुबमन गिलनेही आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

22:17 (IST) 18 May 2025

DC vs GT Live: साई सुदर्शनचं अर्धशतक पूर्ण

साई सुदर्शनने सलाललणमीला फलंदाजी करताना ३१ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह त्याने गुजरातला मजबूत स्थितीत पोहोचवलं आहे.

21:59 (IST) 18 May 2025

DC vs GT Live: गुजरातच्या ५० धावा पूर्ण

गुजरात टायटन्सला हा सामना जिंकण्यासाठी २०० धावांची गरज आहे. या धावांचा पाठलाग करताना गिल आणि सुदर्शनने मिळून गुजरातला पाचव्या षटकात ५० धावांचा पार पोहोचवलं आहे.

21:43 (IST) 18 May 2025

DC vs GT Live: गुजरातच्या फलंदाजीला सुरूवात

दिल्लीने दिलेल्या २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी गिल आणि सुदर्शनची जोडी उतरली आहे. पहिल्यातच षटकात गिलने षटकार लगावला. तर साई सुदर्शनने आपल्या उत्कृष्ट फॉर्मच्या जोरावर चांगली सुरूवात केली.

21:22 (IST) 18 May 2025
DC vs GT Live: केएल राहुलचं शानदार शतक! दिल्लीने गुजरातसमोर ठेवलं इतक्या धावांचं आव्हान

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुलने शानदार शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर दिल्लीने १९९ धावांचा डोंगर उभारला आहे. गुजरातला २० षटकांअखेर २०० धावा करायच्या आहेत.

21:13 (IST) 18 May 2025

KL Rahul Century: केएलचा क्लास! दिल्लीत राहुलचं रेकॉर्डब्रेकिंग शतक

या सामन्यात फलंदाजी करताना केएल राहुलची बॅट चांगलीच तळपली. केएल राहुलने ६० चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं.

21:00 (IST) 18 May 2025

DC vs GT Live: दिल्ली कॅपिटल्सला तिसरा धक्का! कर्णधार अक्षर पटेल तंबूत

दिल्ली कॅपिटल्सला तिसरा धक्का बसला आहे. कर्णधार अक्षर पटेल २५ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे.

20:38 (IST) 18 May 2025

DC vs GT Live: दिल्ली कॅपिटल्सला दुसरा मोठा धक्का

दिल्ली कॅपिटल्सला दुसरा मोठा धक्का बसला आहे. अभिषेक पोरेल ३० धावांवर माघारी परतला आहे.

20:28 (IST) 18 May 2025

DC vs GT Live: केएल राहुलचं अर्धशतक पूर्ण! दिल्ली मजबूत स्थितीत

या डावात केएल राहुलने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. १० षटकांनंतर दिल्लीने ८० धावांचा पल्ला गाठला आहे.

20:04 (IST) 18 May 2025

DC vs GT Live: केएल राहुलने रचला इतिहास

या सामन्यात फलंदाजी करताना केएल राहुलने इतिहास रचला आहे. केएल राहुल ही टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ८००० धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे.

19:58 (IST) 18 May 2025

DC vs GT Live: पावरप्लेमध्ये

पावरप्लेमध्ये दिल्लीला हवी तशी सुरूवात करता आलेली नाही. फाफ डू प्लेसिस स्वस्तात बाद होऊन माघारी परतला. केएल राहुल अजूनही खेळपट्टीवर टिकून आहे.

19:12 (IST) 18 May 2025
DC vs GT Live: महत्वाच्या सामन्यात गुजरातने जिंकला टॉस! दिल्लीला फलंदाजीचं आमंत्रण

या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

19:04 (IST) 18 May 2025

DC vs GT LIVE: ध्रुव जुरेलचं अर्धशतक

राजस्थानला चांगल्या सुरूवातीनंतर अखेरपर्यंत सामन्यात कायम ठेवण्याचं काम ध्रुव जुरेलने केलं आहे. २८ चेंडूत ५१ धावा करत ध्रुवने अर्धशतक पूर्ण केलं.

18:30 (IST) 18 May 2025

DC vs GT LIVE: गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ

शुबमन गिल (कर्णधार), रशीद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरुख खान, जोस बटलर, मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा, प्रसिध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, शेरफेन रदरफोर्ड, जेराल्ड कोएत्झी, आर साई किशोर, महिपाल लोमरोर, गुरनूर सिंग ब्रार, मोहम्मद खान, अरविंद खान, इशांत शर्मा, कुमार कुशाग्र, मानव सुथार, अनुज रावत, मानव सिंधू, जयंत यादव, ग्लेन फिलिप्स, करीम जनात, कुलवंत खेजुरालिया.

18:29 (IST) 18 May 2025

DC vs GT LIVE: दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ

करुण नायर, हॅरी ब्रूक, जॅक फ्रेझर मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, डोनोव्हन फेरेरिया, केएल राहुल, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, अजय मंडल, विपराज निगम, मनवंत कुमार, त्रिपुराण विजय, माधव तिवारी, दुष्मंथ चमेरा, माधव तिवारी, दुष्मंथ चमेरा, मोहित शर्मा, टी. नटराजन, मुकेश कुमार, अक्षर पटेल, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव</p>

IPL 2025 DC vs GT Highlights