IPL 2025 PBKS vs DC Live Match Score Updates: जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. मुंबई इंडियन्सकडून पराभूत झाल्यानंतर दिल्लीचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर पंजाब किंग्जला अव्वल स्थानी जाण्याची संधी असणार आहे.
PBKS vs DC Live: दिल्लीची विजयाच्या दिशेने वाटचाल
दिल्लीला हा सामना जिंकण्यासाठी २०६ धावांची गरज आहे. दिल्लीने ११ षटकांअखेर ११२ धावा केल्या आहेत.
PBKS vs DC Live: अय्यर- स्टोइनिसची तुफान फटकेबाजी! पंजाबने दिल्लीसमोर ठेवलं इतक्या धावांचे आव्हान
या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना श्रेयस अय्यरने शानदार अर्धशतकी खेळी केली. तर शेवटी मार्कस स्टोइनिसने नाबाद ४४ धावा करत संघाची धावसंख्या २०६ धावांवर पोहोचवली. दिल्लीला हा सामना जिंकण्यासाठी २०७ धावांची गरज आहे.
PBKS vs DC Live: श्रेयस अय्यरचं अर्धशतक पूर्ण! पंजाबची मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल
श्रेयस अय्यरने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. पंजाबने आतापर्यंत १७० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
PBKS vs DC Live: पंजाबचे ४ फलंदाज तंबूत! नेहाल वढेरा परतला माघारी
पंजाबचे ४ फलंदाज तंबूत परतले आहेत. नेहाल वढेरा १६ धावांवर माघारी परतला आहे.
PBKS vs DC Live: पंजाब किंग्जच्या १०० धावा पूर्ण! अय्यर- वढेराची जोडी जमली
पंजाबने १०० धावा पूर्ण केल्या आहेत. सुरूवातीला २ धक्के बसल्यानंतर श्रेयस अय्यर आणि नेहाल वढेराची जोडी जमली आहे.
PBKS vs DC Live: इन फॉर्म प्रभसिमरन सिंग बाद
प्रभसिमरन सिंगला चांगली सुरूवात मिळाली होती. मात्र, तो २८ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे.
PBKS vs DC Live : पंजाब किंग्जला दुसरा धक्का! जोस इंग्लिस परतला तंबूत
पंजाब किंग्जला दुसरा मोठा धक्का बसला आहे. जोस इंग्लिस ३२ धावांवर माघारी परतला आहे,
PBKS vs DC Live: पंजाब किंग्जला पहिला धक्का! प्रियांश आर्य स्वस्तात माघारी
पंजाब किंग्जला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला आहे. संघातील सलामीवीर फलंदाज प्रियांश आर्य स्वस्तात माघारी परतला आहे.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंजाब किंग्ज (Playing XI):
प्रभसिमरण सिंग, प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहाल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, मारको जॅन्सन, अझमातुल्ला ओमरझई, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग
दिल्ली कॅपिटल्स (Playing XI):
फाफ डु प्लेसिस (कर्णधार), सेदिकुल्लाह अतल, करुण नायर, समीर रिजवी, ट्रिस्टन स्टब्स (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, विप्रज निगम, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुस्ताफिजूर रहमान, मुकेश कुमार