IPL 2025 RR vs CSK Highlights: राजस्थान रॉयल्सने विजयासह आयपीएल २०२५ ची सांगता केली आहे. राजस्थानने लीग टप्प्यातील अखेरच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा ६ विकेट्स आणि १७ चेंडू शिल्लक ठेवत पराभव केला. वैभव सूर्यवंशी-संजू सॅमसनची फलंदाजी, ध्रुव जुरेलचं फिनिशिंग आणि आकाश मधवालच्या गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानने चेन्नईवर शानदार विजय मिळवला.
IPL 2025 Rajasthan Royals vs Chennai Super Kings Highlights: आयपीएल २०२५ राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स सामन्याचे हायलाईट्स
राजस्थानने १८ चेंडू शिल्लक ठेवत चेन्नईचा ४ विकेट्सने पराभव केला आहे.
RR vs CSK LIVE: अश्विनच्या षटकात २ विकेट
आर अश्विनच्या १४व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर संजू सॅमसन झेलबाद झाला. तर अखेरच्या चेंडूवर चांगली फलंदाजी करणारा वैभव सूर्यवंशीही झेलबाद झाला. राजस्थानचा संघ शेवटच्या सामन्यात तरी विजयी पताका फडकवणार का, यावर सर्वांच्या नजरा आहेत.
RR vs CSK LIVE: वैभव सूर्यवंशीचं अर्धशतक
राजस्थानचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने २८ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५३ धावा करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह राजस्थानला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं आहे. तर संजू सॅमसननेही त्याला चांगली साथ दिली आहे. यासह राजस्थानने १२ षटकांत १ बाद १२१ धावा केल्या आहेत.
RR vs CSK LIVE: यशस्वी जैस्वाल क्लीन बोल्ड
यशस्वी जैस्वाल अंशुल कंबोजच्या चौथ्या षटकातील चौथ्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. यासह राजस्थानला पहिला धक्का लागला. जैस्वाल १९ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ३६ धावा करत बाद झाला.
RR vs CSK LIVE: जैस्वालने खलीलची केली धुलाई
संथ सुरूवातीनंतर यशस्वी जैस्वालने खलील अहमदच्या तिसऱ्या षटकात शानदार फलंदाजी केली. त्याने खलीलच्या षटकात ३ चौकार आणि १ षटकार लगावत १९ धावा केल्या आणि संघाचा डाव सावरला.
RR vs CSK LIVE: चेन्नईने विजयासाठी दिल्या इतक्या धावा
चेन्नई सुपर किंग्सला आयुष म्हात्रे आणि डेवाल्ड ब्रेविस यांच्या शानदार फटकेबाजीनंतरही मोठ्या धावसंख्येत फिनिश करता आलं नाही. अखेरच्या ३ षटकांमध्ये धोनी आणि शिवम दुबे फक्त १७ धावा करू शकले. यासह चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १८७ धावा केल्या आहेत. आयुष म्हात्रेने २० चेंडूत ८ चौकार आणि एका षटकारासह ४३ धावांची खेळी केली. तर त्यानंतर डेवाल्ड ब्रेविसने २५ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ४२ धावा केल्या आणि शिवम दुबेसह ५९ धावांची भागीदारीही केली. तर शिवम दुबे ३९ धावा करत बाद झाला. राजस्थानच्या आकाश मधवाल आणि तुषार देशपांडने अखेरच्या षटकांत चांगली गोलंदाजी करत चेन्न्ईच्या धावांना ब्रेक लावला. यासह राजस्थानला विजयासाठी १८८ धावांचे आव्हान दिले आहे.
RR vs CSK LIVE: शिवम दुबे, धोनी झेलबाद
शिवम दुबे आणि एमएस धोनीला आकाश मधवालने अखेरच्या षटकात झेलबाद केलं आणि मोठा फटका खेळण्याची एकही संधी दिली नाही. आकाश मधवालने १८व्या षटकात ४ धावा दिल्या. तर अखेरच्या षटकात ७ धावा दिल्या. आकाशने कमालीची गोलंदाजी करत ४ षटकांत २८ धावा देत ३ विकेट घेतले.
RR vs CSK LIVE: ब्रेविस क्लीन बोल्ड
१४व्या षटकात आकाश मधवाल गोलंदाजी करण्यासाठी आला. ब्रेविस फटकेबाजी करत चेन्नईला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेत होता. पण मधवालने त्याला चौथ्या चेंडूवर क्लीन बोल्ड करत माघारी धाडलं. ब्रेविस २५ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ४२ धावा करत बाद झाला.
RR vs CSK LIVE: भागीदारी
डेवाल्ड ब्रेविस आणि शिवम दुबे यांनी ५ विकेट्स गमावल्यानंतर चेन्नईचा डाव सावरला आहे. यासह ब्रेविस आणि दुबेने अर्धशतकी भागीदारीही केली. यासह चेन्नईने १३ षटकांत ५ बाद १३३ धावा केल्या आहेत.
RR vs CSK LIVE: चेन्नईचा निम्मा संघ माघारी
आयुष म्हात्रे झेलबाद झाल्यानंतर चेन्नईच्या फलंदाजीला सुरूंग लागला आणि एकेक विकेट गमावली. युधवीर सिंगच्या गोलंदाजीवर रविंद्र जडेजाने आपली विकेट गमावली. ध्रुव जुरेलने एक कमालीचा झेल टिपत चेन्नईला अजून एक धक्का दिला. यासह चेन्नईने ८ षटकांत ५ बाद ७८ धावा केल्या आहेत.
RR vs CSK LIVE: अश्विन झेलबाद
सातव्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात हसरंगाच्या गोलंदाजीवर अश्विन झेलबाद झाला. अश्विन ८ चेंडूत १ चौकार एका षटकारासह १३ धावा करत बाद झाला.
RR vs CSK LIVE: पॉवरप्ले
चेन्नईने २ विकेट्स गमावल्यानंतरही आयुष म्हात्रेने वादळी फटकेबाजी केली आणि संघाला पॉवरप्लेमध्ये मोठी धावसंख्या उभारून देत चांगली सुरूवात करून दिली. पण अखेरीस पॉवरप्लेच्या अखेरच्या चेंडूवर तुषार देशपांडेने आयुषला झेलबाद करत चेन्नईला मोठा धक्का दिला. आयुष म्हात्रे २० चेंडूत ८ चौकार आणि एका षटकारासह ४३ धावा करत बाद झाला. यासह चेन्नईने पॉवरप्लेमध्ये ३ बाद ६८ धावा केल्या.
RR vs CSK LIVE: २ षटकात २ विकेट
युधवीर सिंग चरकने सामन्याच्या दुसऱ्याच षटकात डेव्हॉन कॉन्वेला झेलबाद केलं. डेव्हॉन कॉन्वेने या सामन्यात चांगली सुरूवात केली होती. पण मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. तर अखेरच्या चेंडूवर नुकताच आलेला उर्विल पटेल झेलबाद झाला.
RR vs CSK LIVE: राजस्थान रॉयल्सची प्लेईंग इलेव्हन
यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, क्वेना मफाका, युधवीर सिंग चरक, तुषार देशपांडे, आकाश मधवाल
RR vs CSK LIVE: चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग इलेव्हन
आयुष म्हात्रे, डेव्हॉन कॉन्वे, उर्विल पटेल, रवींद्र जडेजा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, एम एस धोनी (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, अंशुल कंबोज, खलील अहमद
राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स सामन्याची नाणेफेक राजस्थानने जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानने अखेरच्या सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. तर चेन्नईच्या ताफ्यात बदल करण्यात आलेला नाही.
RR vs CSK LIVE: राजस्थानचा अखेरचा सामना
राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानी आहेत. दोन्ही संघ अखेरच्या स्थानी यंदाची मोहिम न संपवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई असणार आहे. याचबरोबर राजस्थानचा यंदाच्या मोहिमेतील हा अखेरचा १४ वा सामना असणार आहे.
RR vs CSK LIVE: चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण संघ
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथिशा पाथीराना, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हॉन कॉनवे, सय्यद खलील अहमद, रचिन रवींद्र, अंशुल कंबोज, राहुल त्रिपाठी, सॅम करन, गुर्जपनीत सिंग, नॅथन एलिस, दीपक हुड्डा, जेमी ओव्हरटन, विजय शंकर, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, श्रेयस गोपाल, रामकृष्ण घोष, कमलेश नागरकोटी, मुकेश चौधरी, शेख रशीद
RR vs CSK LIVE: राजस्थान रॉयल्सचा संपूर्ण संघ
संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, संदीप शर्मा, जोफ्रा आर्चर, महेश तीक्ष्णा, वानिंदू हसरंगा, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, नितीश राणा, युधवीर सिंग, फजलहक फारुकी, वैभव सुर्यवंशी, क्वेना मफाका, कुमार कार्तिकेय, कुणाल राठोड, अशोक शर्मा, तुषार देशपांडे, शुभम दुबे.