आयपीएलमध्ये गोलंदाजांना उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी कमी असते. २० षटकं आणि ११ खेळाडू यामुळे पहिल्या पाच षटकात गडी बाद झाला नाही, तर मात्र गोलंदाजी करणं कठीण होतं. फलंदाज आक्रमकपणे गोलंदाजाना सळो की पळो करुन सोडतात. मात्र तीन गोलंदाज असे आहेत की त्यांनी मुंबई इंडियन्सविरोधात चांगली कामगिरी केली आहे. यंदाच्या पर्वात आरसीबीच्या हर्षल पटेल आणि कोलकाताच्या आंद्रे रसेलने मुंबईच्या फलंदाजांचं कंबरडं मोडलं.

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइटराइडर्स या सामन्यात आंद्रे रसेलने चांगली गोलंदाजी केली. १८ वं षटक जेव्हा कर्णधाराने रसेलला सोपवलं तेव्हा मुंबईच्या हाती ५ गडी होते. पोलार्ड आणि जनसेन मैदानात खेळत होते. मात्र रसेलने पहिल्याच षटकात मुंबईचे २ गडी बाद केले. त्यानंतर शेवटचं षटक टाकताना आणखी ३ गडी बाद करत मुंबईला १५२ धावांवर रोखलं. रसेलने १५ धावा देत ५ गडी बाद केले. मात्र कोलकाताच्या खराब फलंदाजीमुळे संघाला पराभव पत्कारावा लागला.

मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर सेहवागने कार्तिक-रसेलविषयी दिली ‘तिखट’ प्रतिक्रिया

बंगळुरुच्या हर्षल पटेल याने मुंबई विरुद्ध चांगली गोलंदाजी करत ५ गडी बाद केले. पटेलनं आपल्या भेदक गोलंदाजींनं मुंबईच्या संघाला १६० धावांवर रोखलं. पहिल्या तीन षटकात पटेलनं दोन गडी बाद केले. त्यानंतर शेवटच्या षटकात फक्त १ धाव देत तीन जणांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याच्या चांगल्या गोलंदाजीमुळे मुंबईची धावसंख्या रोखली गेली आणि हा सामना बंगळुरुने २ गडी राखत जिंकला.

‘हे’ चार संघ आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ऑलआउट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएलच्या कारकिर्दीत रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. अगदी खरं आहे, मुंबईचा कर्णधार आणि त्यानेच मुंबईविरोधात गडी बाद केले असं कसं होईल. रोहित शर्मा २००९ सालच्या आयपीएल सामन्यात डेक्कन चार्जर्सकडून मैदानात उतरला होता. तेव्हा रोहित शर्मा गोलंदाजी करायचा. तेव्हा त्याने उत्तम गोलंदाजी करत मुंबईचे ४ गडी बाद केले होते आणि फक्त ६ धावा दिल्या होत्या. डेक्कन चार्जर्सने पहिल्यांदा फलंदाजी करत १४६ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र रोहितने हॅटट्रीक घेत मुंबईला १९ धावांनी पराभूत करण्यात योगदान दिलं.