Delhi Capitals vs Chennai Super Kings Score Today, 20 May 2023: आज आयपीएल २०२३ मधील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आहे. चेन्नई संघाला हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचे आहे. त्याचवेळी दिल्लीचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असून चेन्नईचा खेळ खराब करण्याचा प्रयत्न करेल. या संघाने त्यांच्या शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव केला आहे. या सामन्यात चेन्नईला सावध राहावे लागणार आहे. चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महेंद्रसिंग धोनीबाबत चाहत्यांमध्ये किती क्रेझ आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. घरचा संघ वगळता जिथे जिथे सामना होत आहे तिथे लोक धोनी आर्मी म्हणजेच यलो जर्सीमध्ये दिसत आहेत. असाच काहीसा प्रकार दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पाहायला मिळाला. संपूर्ण स्टेडियम ७ क्रमांकाच्या जर्सीने भरलेले दिसत आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार मैदानावर उतरताच चाहत्यांनी धोनी-धोनीचा जल्लोष सुरू केला.

‘धोनी-धोनी’च्या घोषणा इतक्या जोरात होत्या की त्या गोंगाटात टॉसच्या वेळी प्रेजेंटर डॅनी मॉरिसन हिंदीत ‘आराम से आराम…’ म्हणू लागला. जेव्हा नाणेफेक झाली आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेक जिंकली तेव्हा मॉरिसनला काहीही ऐकू आले नाही. यामुळे मॉरिसन धोनीला हातवारे करून विचारू लागला, “फलंदाजी की गोलंदाजी?” यावर धोनीने त्याला हाताने खुणवत बॅटकडे बोट दाखवले. त्यानंतर माहीच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले. तो त्रास समजू शकला कारण तो स्वतः त्यातून गेला आहे.

दुसरीकडे, नाणेफेक जिंकल्यानंतर धोनी म्हणाला, “आम्ही फलंदाजी करू. पहिल्या गेमपासूनच आम्ही सामना जिंकण्याचा प्रयत्न करत आहोत. संघात कोणताही बदल झालेला नाही. ही एक संतुलित इलेव्हन आहे आणि आम्हाला जास्त बदल करण्याची गरज नाही. दिवसाचा खेळ वेगळा असतो, सामना जसजसा पुढे जाईल तसतशी खेळपट्टीही संथ होत जाईल, त्यामुळे आम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. संघातील युवा खेळाडूंनी शिकावे अशी माझी इच्छा आहे.”

आयपीएल २०२३ मधील धोनीच्या संघाचा हा शेवटचा लीग सामना आहे. ती येथे जिंकली तर ती प्लेऑफमध्ये पोहोचेल. असे झाले नाही तर ४ वेळच्या चॅम्पियनला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. चेन्नई सुपर किंग्जची फलंदाजी सुरू झाली आहे. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे ही सलामीची जोडी क्रीझवर आहे. खलील अहमद दिल्लीसाठी पहिले षटक करत आहे. चेन्नईने चांगली सुरुवात केली आहे. तीन षटकांनंतर चेन्नईची धावसंख्या बिनबाद ३० आहे.

हेही वाचा: BCCI: बीसीसीआयचा मोठा निर्णय! लैंगिक छळ प्रतिबंधक धोरणाला सर्वसाधारण सभेत मंजुरी, विश्वचषक स्पर्धेसाठी तयार केली नवी रणनीती

दोन्ही संघातील ११ खेळत आहे

चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर/कर्णधार), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश तिक्षना.

इम्पॅक्ट खेळाडू: मथिशा पाथिराना, मिचेल सॅन्टनर, शुभ्रांशू सेनापती, शेख रशीद, आकाश सिंग.

दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), रिले रुसो, यश धुल, अमन हकीम खान, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद, ऑनरिक नॉर्खिया.

इम्पॅक्ट खेळाडू:  पृथ्वी शॉ, मुकेश कुमार, प्रवीण दुबे, रिपल पटेल, अभिषेक पोरेल.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl2023 danny morrison troubled by cheers noise dhoni dhoni stadium a funny incident happened during throwing avw
First published on: 20-05-2023 at 16:20 IST