scorecardresearch

IPL 2023: सूर्यकुमार यादव हॉटेल रूमचा पासवर्ड विसरल्याने झाली पंचाईत, मग कसा उघडला दरवाजा? पाहा मजेदार VIDEO

Suryakumar Yadav New Video: मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२३ सुरू होण्यापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला आहे. सूर्यकुमार यादव आपल्या हॉटेलच्या रूमचा पासवर्ड विसरल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

Suryakumar Yadav New Video
सूर्यकुमार यादव (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Suryakumar Yadav forgetting his hotel room password:आयपीएल २०२३ चा पहिला सामना ३१ मार्चला (शुक्रवार) खेळवला जाणार आहे. म्हणजे आता स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. आयपीएलच्या १६व्या हंगामापूर्वी सर्व खेळाडू आपापल्या फ्रँचायझींमध्ये सामील होत आहेत. मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवही आपल्या संघात सहभागी झाला आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सने सूर्याचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आपल्या हॉटेल रूमचा पासवर्ड विसरल्याचे दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सूर्या त्याच्या खोलीकडे जातो आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो, पण दरवाजा उघडत नाही. आतून आवाज येतो, “अॅक्सेस डिनाइड. पासवर्ड पाहिजे.” हे ऐकल्यानंतर सूर्याने बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांतील डॉयलॉग बोलून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो वारंवार अपयशी ठरतो. ज्यामध्ये तो पहिल्यांदा म्हणतो, ‘क्या गुंडा बनेगा रे तू’ हे गाणे . यानंतर, तो विविध डॉयलॉग बोलतो, परंतु काही उपयोग होत नाही आणि दार उघडत नाही.

सूर्या शेवटी ‘सुपला शॉट’ म्हणतो आणि असे म्हणताच दरवाजा उघडतो. मुंबई इंडियन्सने हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “पासवर्ड खूप छान, पण उशिरा लक्षात आला.” या व्हिडिओमध्ये सूर्याचा दमदार अभिनय पाहायला मिळाला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत ११ लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे, तर सुमारे ८ हजार लोकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

किंग कोहलीने केली कमेंट –

दिग्गज खेळाडू विराट कोहलीपासून ते शिखर धवनपर्यंत सर्वांनीही या व्हिडिओवर कमेंट केली आहे. कोहलीने हसणारा इमोजी कमेंट केली. याशिवाय शिखर धवननेही हसणाऱ्या इमोजीसह कमेंट केली. दोन्ही खेळाडूंना सूर्याचा अभिनय खूप आवडला आहे.

हेही वाचा – IPL 2023: केकेआर टीमला मिळाला नवा कर्णधार; ‘या’ युवा खेळाडूच्या हाती असणार संघाची धुरा

मुंबई इंडियन्स संघ –

कॅमेरॉन ग्रीन, रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, टीम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, जोफ्रा आर्चर, डेवाल्ड ब्रेविस, टिळक वर्मा, जेसन बेहरेनडॉर्फ, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर, रमणदीप सिंग, शम्स मुलानी, नेहल वढेरा, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकेन, आकाश मधवाल, अर्शद खान, राघव गोयल, डुआन यान्सन, ट्रिस्टन स्ट्रब्स आणि विष्णू विनोद.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 10:29 IST

संबंधित बातम्या