Mohammad Kaif Says Ricky Ponting did not want Shikhar Dhawan : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्याच्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो. टीम इंडियाचा कर्णधार असतानाही त्याने प्रतिभावान खेळाडूंसाठी निवडकर्त्यांशी वाद घातला होता. आता निवृत्तीनंतर ही जेव्हा तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा संचालक होता, तेव्हा त्यानी तेच केले. सौरव गांगुलीने दिल्लीचे माजी प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगशी शिखर धवनसाठी वाद घातला होता. याबाबत भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने खुलासा केला. यासह कैफने दिल्ली कॅपिटल्सच्या ड्रेसिंग रूममधील अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

मोहम्मद कैफचा रिकी पॉन्टिंगबद्दल खुलासा –

मोहम्मद कैफने सांगितले की, रिकी पॉन्टिंग दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक असताना, तो ऑस्ट्रेलियन खेळाडूंना महत्त्व देत होता. त्यामुळे सौरव गांगुलीही त्याच्या विरोधात गेला होता. कैफने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्समध्ये भारतीय खेळाडूंना महत्त्व दिल्याबद्दल, कैफने गांगुलीचे कौतुक केले आहे. कैफने सांगितले की, २०१९ च्या हंगामापूर्वी पॉन्टिंगला सनरायझर्स हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नरला ट्रेड करायचे होते, परंतु गांगुलीने धवनचे नाव घेतले होते. याबाबतीत गांगुली पॉन्टिंगच्या विरोधात उभा राहिला आणि यशस्वी झाला.

मोहम्मद कैफकडून सौरव गांगुलीचे कौतुक –

मोहम्मद कैफ म्हणाला, “मला वाटते की आम्ही बनवलेल्या संघासोबत तो चांगली कामगिरी करू शकला असता, हे पॉन्टिंगलाही मान्य असेल. तुमचा विश्वास बसणार नाही की एक वेळ अशी होती, जेव्हा आम्ही कोणाला प्लेइंग इलेव्हन वगळायचे याचा विचार करायचो. अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा आणि शिमरन हेटमायर यांनाही संघात जागा मिळत नव्हती. यानंतर आम्ही जेव्हा लिलावात गेलो. ज्यामध्ये आम्ही भारतीय खेळाडूंना महत्त्व दिले, ज्याबद्दल सौरव गांगुलीचे कौतक केले पाहिजे. यावर तो ठाम राहिला त्याने धवनशी चर्चा केली आणि त्यानंतर धवन दिल्ली संघात आला.”

हेही वाचा – Rishabh Pant : ‘पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सला सोडलं नाही…’, IPL 2025 च्या महालिलावापूर्वी ऋषभ पंतच्या पोस्टने खळबळ ’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पॉन्टिंगला संघात वॉर्नर हवा होता –

मोहम्मद कैफ पुढे सांगितले की, पॉन्टिंगला संघात त्याच्या देशाचा वॉर्नर हवा होता आणि त्याला वाटत होते की धवनची कारकीर्द संपली आहे. कैफ म्हणाला, “आम्ही काय करायचं याचा विचार करत होतो. पण तो गांगुलीच होता, ज्याने आम्हाला समजावलं आणि धवनला आणलं. पण पॉन्टिंग यावर सहमत नव्हता. त्याला वाटत होतं की धवनची कारकीर्द संपली आहे. कारण हीच ती वेळ होती, जेव्हा तो कसोटी संघाबाहेर होता. गांगुलीने पॉन्टिंगचे मन वळवले आणि धवनच्या आयपीएलच्या आकडेवारीचा हवाला देत त्याला संघात आणले.”