आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५५ व्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सला धुळ चारली. या सामन्यात चेन्नईचा तब्बल ९१ धावांनी विजय झाला. या दणदणीत सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघातील खेळाडूंमध्ये चैतन्य निर्माण झालं आहे. दरम्यान या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने अनोखा विक्रम रचला आहे. त्या हा विक्रम नोंदवत थेट विराट कोहलीच्या पंक्तीत स्थान मिळवलंय.
हेही वाचा >> पुन्हा भोपळा! विराट कोहली शून्यावर बाद, गोल्डन डकवर आऊट होण्याची तिसरी वेळ
विराट कोहलीने या सामन्यात टी-२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ६००० धावा पूर्ण केल्या आहेत. हा विक्रम नोंदवण्यासाठी विराटला फक्त चार धावांची गरज होती. मात्र त्याने दिल्ली विरोधातील सामन्यात ८ चेंडूमध्ये चौकार आणि षटकार लगावत २१ धावा केल्या. याआधी हा विक्रम फक्त विराट कोहलीच्या नावावर होता. त्यानेदेखील टी-२० फॉरमॅटमध्ये कर्णधार असताना ६००० धावा केलेल्या आहेत.
हेही वाचा >> राजस्थानच्या शिमरॉन हेटमायरचा मोठा निर्णय, आयपीएल सोडून परतला मायदेशी, कारण काय?
दिल्लीविरोधातील सामन्यात शिवम दुबे बाद झाल्यानंतर ४० वर्षीय महेंद्रसिंह धोनी १८ वे षटक सुरु असताना मैदानात आला. त्याच्या वाट्याला फक्त ८ चेंडू आले. या आठ चेंडूंमध्ये त्याने २१ धावा केल्या. एक चौकार आणि दोन षटकार लगावत त्याने ही किमया साधली. धोनीच्या धावसंख्येमुळेच चेन्नई संघाने २०८ धावांपर्यंत मजल मारली.
हेही वाचा >> ग्लेन मॅक्सवेलची कमाल! हैदराबादच्या सलामीवीरांना पहिल्याच षटकात शून्यावर केलं बाद
दरम्यान, महेंद्रसिंह धोनी आणखी एक विक्रम करण्याच्या मार्गावर आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये तो ५००० धावांच्या कल्बमध्ये जाण्यापासून फक्त ९१ धावांनी दूर आहे. आगामी काही सामन्यांमध्ये तो ९१ धावा करण्यात यशस्वी झाला, तर त्याच्या आयपीएल क्रिकेटमध्ये ५ हजार धावा पूर्ण होतील. तो विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, डेविड वॉर्नर, सुरेश रैना, एबी डिव्हिलियर्स या खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसेल.