Kolkata Knight Riders vs Gujarat Titans Score Updates: आयपीएलच्या १६व्या हंगामातील प्रत्येक सामन्यात रोमांच पाहायला मिळत आहे. रविवारी खेळल्या गेलेल्या चौथ्या डबल हेडरच्या पहिल्या सामन्यातही असेच दृश्य पाहायला मिळाले. २७ वर्षीय नारायण जगदीशन याने कोलकाता नाईट रायडर्सकडून पहिला सामना खेळताना शानदार झेल घेतला. त्याचा हा झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जगदीशनने रिद्धिमान साहाचा झेल घेतला –

डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात रविवारी गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना झाला. यादरम्यान गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रिद्धिमान साहाने चांगली सुरुवात केली. त्याने वेगवान फलंदाजी करत ३ चौकारांच्या मदतीने १७ धावा केल्या. दरम्यान, पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रिद्धिमान साहाला मोठा शॉट खेळायचा होता, पण नारायण जगदीशनने अप्रतिम झेल घेत रिद्धिमानला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले.

जगदीशनला केकेआरने ९० लाख रुपयांना विकत घेतले –

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कोची येथे झालेल्या लिलावात अनेक संघांनी नारायण जगदीशनमध्ये रस दाखवला होता. चेन्नई आणि कोलकाता यांच्यात त्याच्याबद्दल चुरस पाहिला मिळाली होती, पण शेवटी, केकेआरने त्याला ९० लाख रुपयांना विकत घेतले आणि संघात समाविष्ट केले. याआधी तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळायचा, जो आयपीएलचा दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे.

हेही वाचा – IPL 2023 KKR vs GT: आयपीएल इतिहासात शुबमन गिलचा मोठा धमाका; विराट, रैना आणि संजूला मागे टाकत रचला विक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जगदीशनने ११० च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत –

नारायण जगदीशनला आयपीएलमध्ये खेळण्याचा फारसा अनुभव नाही. तो आतापर्यंत आयपीएलमध्ये केवळ सात सामने खेळला आहे. यामध्ये त्याने ११०.६१ च्या स्ट्राईक रेटने एकूण ७३ धावा केल्या आहेत. यामध्ये ७ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. जगदीशन २०२० मध्ये प्रथमच आयपीएल सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. २०२३ मध्ये, त्याने एकूण पाच सामने खेळले, ज्यामध्ये त्याने ११३.५० च्या स्ट्राइक रेटने ३३ धावा केल्या. पुढच्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. २०२२ मध्ये त्याला केवळ दोन सामन्यांमध्ये मैदानात उतरण्याची संधी मिळाली. या दोन सामन्यात त्याने १०८.११च्या स्ट्राईक रेटने एकूण ४० धावा केल्या.