India Head Coach Application: भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी बीसीसीआयने अर्ज पाठवण्याचे आवाहन केले होते. या पदासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत संपली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) ३००० हून अधिक अर्ज आल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर या शर्यतीत आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र त्याच्या नावाचा अर्ज आलेला नाही. याशिवाय नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर आणि अमित शहा यांच्यासह काही प्रसिद्ध नावांचे बनावट अर्ज या पदासाठी केले गेले आहेत.

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी अनेक अज्ञात लोकांनी खोट्या नावांनी फॉर्म भरले आहेत आणि प्रसिद्ध व्यक्ती आणि राजकीय नेत्यांची बनावट नावे वापरून अर्ज सादर केले. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, बोर्डाकडे तेंडुलकर, धोनी, हरभजन सिंग आणि वीरेंद्र सेहवागसह माजी क्रिकेटपटूंच्या नावाने अनेक बनावट अर्ज आले आहेत. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही नावे आहेत. १३ मे रोजी, BCCI ने गुगल फॉर्मवर नोकरीसाठी अर्ज मागवले होते आणि दररोज मोठ्या संख्येने या पदासाठी बनावट अर्ज मिळाले.

हेही वाचा – IPL 2024: ५५ लाख रुपयांच्या मानधनावरुन रिंकू सिंग म्हणाला

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले- गेल्या वर्षीही बीसीसीआयला असाच प्रतिसाद मिळाला होता. जिथे लोकांनी अनेक बनावट अर्ज केले होते आणि यावेळीही सारखीच परिस्थिती आहे. बीसीसीआय गुगल फॉर्मवर अर्ज मागवण्याचे कारण म्हणजे अर्जदारांची नावे एकाच शीटवर तपासणे सोपे जाते. मात्र आता हेत त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे.

टीम इंडियाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ टी-२० विश्वचषक २०२४ नंतर संपणार आहे. या मोठ्या स्पर्धेनंतर बीसीसीआयला आशा आहे की भारतीय संघाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळेल. मात्र, द्रविड यांच्या जागी मुख्य प्रशिक्षक कोण होणार याची अजूनही घोषणा झालेली नाही.

हेही वाचा – लुट पुट गया…आंद्रे रसेल आणि अनन्या पांडेचा डान्स करतानाचा व्हीडिओ व्हायरल,कोच चंद्रकांत पंडितही थिरकले

बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकपदासाठी घातल्या कठोर अटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किमान ३० कसोटी सामने किंवा ५० एकदिवसीय सामन्यांचा अनुभव.
किंवा किमान दोन वर्षे पूर्ण वेळ कसोटी खेळणाऱ्या देशाचा मुख्य प्रशिक्षक असणे आवश्यक आहे.
किंवा कोणत्याही असोसिएट सदस्य संघाचा/कोणत्याही आयपीएल संघाचा किंवा अशा कोणत्याही लीग किंवा प्रथम श्रेणी संघाचा किंवा कोणत्याही देशाच्या अ संघाचा तीन वर्षे प्रशिक्षक असण्यचा अनुभव.
किंवा बीसीसीआयचे लेव्हल-3 कोचिंग प्रमाणपत्र धारक असले पाहिजे.
आणि वय ६० वर्षांपेक्षा कमी असावे.