आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ३२ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज या दोन संघांमध्ये मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर ठीक ७.२० वाजता खेळवला जाणार आहे. या सामन्याची पूर्ण तयारी झालेली असताना आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. सामना सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना दिल्ली कॅपिट्लस संघातील आणखी एका परदेशी खेळाडू करोनाची लागण झाल्याचे सामोर आले आहे. दिल्लीच्या ताफ्यात याआधीच एका खेळाडूसह एकूण पाच जणांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. असे असताना आता आणखी एका परदेशी खेळाडूचा करोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्यामुळे चिंता वाढली आहे.

हेही वाचा >> RCB vs LSG : ‘बेटा, तुमसे ना हो पायेगा’ म्हणणाऱ्या लखनऊची आरसीबीने केली बोलती बंद!; पराभूत करत दिले प्रत्युत्तर

दिल्लीच्या ताफ्यात आणखी एका खेळाडूला करोनाची लागण

याआधी दिल्लीच्या ताफ्यात एकूण पाच जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. असे असताना आज दिल्ली आणि पंजाब या दोन संघांमध्ये मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामना होणार आहे. दिल्लीच्या खेळाडूंची आज दुपारी रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. या चाचणीमध्ये दिल्लीच्या संघातील आणखी एका परदेशी खेळाडूला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता सामना सुरु होण्यापूर्वी दिल्लीच्या खेळाडूंची पुन्हा एकदा करोना चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर सामना सुरु होणार आहे.

हेही वाचा >> बंगळुरुने डीआरएस घेतला अन् राहुल झाला बाद, लखनऊचा पराभव समोर दिसताच अथिया शेट्टीचा उतरला चेहरा

दिल्लीच्या सर्वच खेळाडूंना त्याच्या रुममध्ये जाण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर प्रत्येक खेळाडूची करोना चाचणी केली जाईल. या चाचणीमध्ये ज्या खेळाडूंची चाचणी निगेटिव्ह येईल, त्याच खेळाडूंना सामना खेळण्याची परवानगी देण्यात येईल, असे बीसीसीआयने सांगितले आहे. तर दिल्लीच्या उर्वरित ताफ्याची सामन्यानंतर करोना चाचणी केली जाणार आहे.

हेही वाचा >> IPL 2022 : आधीच पराभवाचे शल्य, त्यात आयपीएलने ठोठावला मोठा दंड, केएल राहुलला दुहेरी फटका

दरम्यान, आज होणारा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर होणार होता. मात्र दिल्लीच्या संघात एकूण पाच जणांना करोनाची लागण झाल्यामुळे सामन्याचे ठिकाण पुण्यावरुन मुंबई करण्यात आले. प्रवासादरम्यान संभाव्य करोना संसर्ग टाळता यावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला.