Preity Zinta Faf Du Plessis Viral Photo: आयपीएल २०२५ आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. प्लेऑफचे चार संघ ठरले असले तरी टॉप-२ मध्ये पोहोचण्यासाठी संघांमध्ये चढाओढ सुरू आहे. आजचा पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्सचा सामना महत्त्वाचा असणार आहे. या सामन्यातील विजेता संघ टॉप-२ मध्ये राहणार आहे. यादरम्यान पंजाब किंग्स संघाची मालकिण प्रिती झिंटाचा फाफ डू प्लेसिसबरोबरचा एक फोटो व्हायरल होत आहे.
आयपीएल २०२५ दरम्यान सोशल मीडियावर एका फोटोने धुमाकूळ घातला होता, ज्यामध्ये पंजाब किंग्जची मालकीण प्रीती झिंटा आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार फाफ डू प्लेसिस दिसत होते. या फोटो पाहून चाहत्यांनी त्यांना चित्रपटात एकत्र काम करण्याची मागणी केली आणि यावर फाफही स्वतःला प्रतिसाद देण्यापासून रोखू शकला नाही.
दिल्ली कॅपिटल्सने शनिवारी, २४ मे रोजी जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव करून विजयाने मोहिमेला सांगता केली. दिल्लीचा हा शेवटचा लीग सामना होता कारण संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला होता. या सामन्यात दिल्लीचे नेतृत्व फाफ डु प्लेसिसने केले.
सामन्यानंतर जयपूरमध्ये धुळीचे वादळ आले. यावेळी काढलेला फाफ आणि प्रीती झिंटाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोमध्ये प्रितीचे केस हवेमुळे उडाले आहेत, तर फाफ हाताची घडी घावून उभा आहे. हा फोटो पाहून एका चाहत्याने एक मजेदार कमेंट केली.
चाहत्याने कमेंट केली की, “कृपया फाफ आणि प्रीती झिंटा यांना एका चित्रपटासाठी कास्ट करा. त्यांच्यात एका अॅक्शन हिरो आणि एका रोमँटिक जोडप्याची केमिस्ट्री आहे. प्रिती एका वाइनसारखी आहे, जी काळानुसार अधिक खुलते आहे. त्यांना एखाद्या स्पोर्ट्स चित्रपटात किंवा शाही प्रेमकथेच्या चित्रपटात एकत्र संधी दिली पाहिजे.”
चाहत्याच्या ट्विटला उत्तर देताना, फाफने लिहिले, “हो प्रत्यक्षात घडवून आणा!” त्याच्या उत्तराने चाहते अधिक उत्साहित झाले. पुढे फाफने हसण्याचा आणि कॅमेराचा इमोजीही टाकला आहे.
२०२५ हंगामात फाफची फारशी तळपलेली पाहायला मिळाली नाही. त्याने ९ सामन्यात फक्त २०२ धावा केल्या. दिल्लीने सलग ४ विजयांसह हंगामाची शानदार सुरुवात केली होती, परंतु शेवटी संघाने आपला वेग गमावला आणि प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकला नाही.